AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule: शरद पवार- शिंदे भेटीत घडलं काय? राष्ट्रवादी महायुतीच्या घरात? राऊतांच्या नाराजीनंतर सुप्रिया सुळे यांनी सगळंच सांगितलं

Supriya Sule On Pawar-Shinde Meeting: परवा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. त्या भेटीने राज्याचे राजकारण लवकरच कूस बदलणार अशा चर्चांचे पेव फुटले. राष्ट्रवादी महायुतीत सहभागी होण्याचा दावा झाला. राऊतांची तिखट प्रतिक्रिया आली. दोघांमधील घाडामोडींची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आता दिली आहे.

Supriya Sule: शरद पवार- शिंदे भेटीत घडलं काय? राष्ट्रवादी महायुतीच्या घरात? राऊतांच्या नाराजीनंतर सुप्रिया सुळे यांनी सगळंच सांगितलं
सुप्रिया सुळे, शरद पवार, एकनाथ शिंदे
| Updated on: Jul 10, 2026 | 12:07 PM
Share

Supriya Sule On Pawar-Shinde Meeting: ज्येष्ठ नेते शरद पवार हे विधानभवनात गेले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनातही ते गेले. तिथे शिंदेंनी त्यांचे आदरतिथ्य केले. सत्कार केला. त्यानंतर याच दालनात पवार यांनी आमदारांची बैठक घेतली. बंददाराआड ही बैठक झाली. पण यावरून एकच काहूर उठले. उद्धव ठाकरे शिवसेनेला हा प्रकार जिव्हारी लागला. लागोलाग खासदार संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया समोर आली. पवारांची विश्वासहर्ता अशा भेटीमुळे घसरल्याचे सांगूत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत समोर आले. तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी ही महायुती, NDA सोबत घरोबा करणार असल्याच्या चर्चांना एकच उधाण आले. याप्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली.

सुप्रिया सुळे यांनी त्या भेटीचा घटनाक्रम सांगितला

जी घटना झाली. ज्या पद्धतीने झाली. तिथे काही बैठक नव्हती. शरद पवार हे विधानभवनात गेले. ते चालत येत असताना आमदारांना त्यांच्याशी काही बोलायचे होते. त्या ठिकाणी सर्वात जवळ शिंदे यांचे कॅबिन होते. विधानभवनात असे काही फिक्स कॅबिन नसतात. कॅबिनमध्ये आमदारांसोबत त्यांची चर्चा झाली. राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांशी गाठीभेटी झाल्या. त्यानंतर शरद पवार तिथून बाहेर पडले. आमदारांसाठी ही भेट शिंदे यांच्या कॅबिनमध्ये झाली हा योगायोग होता. ही अगदी सहज झालेली घटना आहे.

मी ही काल संजय राऊत यांना फोन केला. त्यांना घटनाक्रम सांगितला. कुणीतरी राऊत यांना चुकीची माहिती दिली असेल, त्यामुळे गैरसमजातून हे सर्व झाले आणि ते बोलले, असे मला वाटते. जी घटना झाली, ती सर्वांनाच माहिती आहे. हे इतके सहज घडलं की त्याची बातमी झाली याचं मला ही आश्चर्य वाटलं. ही घटना ध्यानीमनीही नव्हती. कदाचित गैरसमजातून राऊत दुखावले गेले असतील. मी काल त्यांच्याशी फोनवर बोलले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देत पडदा टाकला आहे.

त्या भेटीचीही आठवण

तर सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीचा एक घटनाक्रमही उलगडला. अजितदादा ज्यावेळी NDA सोबत गेले. 17 व्या दिवशी उद्धव ठाकरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांना भेटल्याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी करून दिली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिलेले होते. ते त्यावेळी आमदार होते. तर अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे एका संवैधानिक पदावरील व्यक्तीला शुभेच्छा देणे हे मला काही गैर वाटले नाही. आम्ही ते समजून घेतले, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट