Weather Alert : 4 ते 5 दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज

Weather Alert : 4 ते 5 दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज

येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय.

सागर जोशी

|

Apr 08, 2021 | 8:31 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर दुसरीकडे उष्णताही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मात्र, येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय. त्यामुळे फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं बनलंय. (Rainfall forecast for Marathwada, Central Maharashtra and some parts of Konkan in next 4-5 days)

येत्या 4 ते 5 दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसंच एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. या कालावधीत विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागानं नोंदवली आहे.

वादळी पावसाच्या दरम्यान

 • जोरदार वारा/गारा लागवड, फलोत्पादन आणि उभे पीक यांचं नुकसान करतात.
 • जोरदार वाऱ्यामुळे असुरक्षित मालमत्तेचं आंशिक नुकसान होतं.
 • गारपीटीने मोकळ्या ठिकाणी बांधलेल्या प्राण्यांना इजा होऊ शकते. तसंच उघड्यावर काम करु नये.
 • कच्ची घरे / भिंती आणि झोपड्यांना किरकोळ नुकसान होऊ शकतं
 • हलक्या वस्तू वाऱ्यामुळे उडू शकतात

काय काळजी घ्याल?

 • शक्यतो घरातच राहा. खिडक्या दारं बंद करा
 • मोकळ्या शेतात आणि गच्चीवर उभं राहू नका
 • सुरक्षित निवाऱ्यात थांबा
 • झाडाखाली उभे राहू नका
 • काँक्रीटच्या मजल्यावर झोपू नका आणि काँक्रीटच्या भिंतींवर रेलू नका
 • विद्यूत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा
 • जलसंतयातून/ संग्रहित पाण्यापासून दूर राहा
 • विजेचा प्रवाह असणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहा
 • वादळी पावसा दरम्यान शेतीची कामे करणं शक्यतो टाळा

संबंधित बातम्या :

Weather Alert : राज्यावर आजही अवकाळी संकट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार

Maharashtra Weather Alert : विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद, पुढचा आठवडा आग लागणार?

Rainfall forecast for Marathwada, Central Maharashtra and some parts of Konkan in next 4-5 days

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें