
Saif Ali Khan Case Maid Statement: मुंबईत अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून गुरुवारी रात्री त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणात सैफ अली खान यांच्या केअरटेकरचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्या मागील चार वर्षांपासून सैफ यांच्या घरात काम करत आहे. त्यांनी नेमके काय घडले ते सर्वकाही पोलिसांना सांगितले.
पोलिसांना दिलेल्या जबाबात केअरटेकरने सांगितले की, मी सैफ अली खान यांचा लहान मुलगा जेह यांची देखभाल करते. सैफ अली खान बाराव्या मजल्यावर राहतात. 15 जानेवारी रात्री रात्री 11 वाजता जेहला झोपवले. त्यानंतर मी झोपण्यासाठी गेली. रात्री दोन वाजता काही आवाज आला. त्यामुळे मी झोपेतून जागे झाले. त्यावेळी बाथरुमचा दरवाजा उघडा होता आणि लाइट सुरु होती. त्यावेळी मला वाटले करीना मॅडम मुलाला भेटण्यासाठी आली असेल. त्यामुळे मी झोपून गेले. त्यानंतर काहीतरी गोंधळ होत असल्याचे मला वाटले. मी बाथरुममध्ये पहिल्यावर एक व्यक्ती दिसला. तो बाहेर आला आणि जेहकडे जाऊ लागला. मी पळून जेहकडे गेले. त्यावेळी त्याने हिंदीत सांगितले, आवाज करु नको. त्यावेळी काही लोक झोपेतून जागे झाले. त्यांनाही त्याने सांगितले आवाज करु नका.
आपल्या जबाबात केअरटेकर पुढे म्हणते, मी त्यावेळी जहांगीर याला उठवण्यासाठी गेली. त्यावेळी तो व्यक्ती एक हेक्सा ब्लेड घेऊन माझ्याकडे धावू लागला. त्याने त्या ब्लेडने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बोटावर तो ब्लेड लागला. त्यावेळी मी त्याला विचारले तर काय हवे? त्याने पैसे सांगितले. मी विचारले किती हवे तर त्याने एक कोटी रुपये रक्कम सांगितली.
मग संधी साधून ओरडत आम्ही खोलीच्या बाहेर आलो. त्यावेळी सैफ आणि करीना मॅडम धावत आले. त्यावेळी सैफ यांनी विचारले तो कोण आहे, त्याला काय हवे? त्यावेळी त्या व्यक्तीने लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेडने सैफ यांच्यावर हल्ला केला. आम्ही सर्व खोलीतून पळालो आणि दार बंद केले. आमचा आवाज ऐकून रमेश, हरी, रामू व पासवान सर्व आले. आम्ही पुन्हा खोलीत गेल्यावर दार उघडे होते.
या घटनेत सैफ यांच्या मानेच्या मागच्या बाजूला, उजव्या खांद्याजवळ, पाठीच्या डाव्या बाजूला आणि डाव्या हाताच्या मनगट आणि कोपरजवळ दुखापत झाली होती. त्याच्या हातातून रक्त येत होते. उजव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर आणि चेहऱ्यावरही जखमा होत्या. हल्ला करणारा व्यक्ती अनोळखी होता. त्याचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे, असे केअरटेकरने सांगितले. जखमी सैफ अली खान यांना रिक्षेतून रुग्णालयात नेण्यात आले.