जेव्हा आयोजकांच्या हातून मुख्यमंत्री माईक हिसकावून घेतात…

जेव्हा आयोजकांच्या हातून मुख्यमंत्री माईक हिसकावून घेतात...

मुंबई : जेव्हा आयोजकांच्या हातून मुख्यमंत्री माईक हिसकावून घेतात… असा मथळा वाचल्यावर तुम्हाला वाटलं असणार, पुन्हा एकदा भाषण करायला मुख्यमंत्र्यांनी माईक घेतला असणार. असंच वाटलं ना सुरुवातीला? पण तसं नाहीय. मुंबईतील कांदिवलीत घडलेला हा म्हटलं तर रंजक, म्हटलंतर जबाबदारीपूर्ण असा प्रसंग आहे. त्याचं झालं असं की, गुजराती समाजाचा पारंपरिक गाण्यांच्या ‘रंग कासुम्भ डायरों’ या कार्यक्रमाचं […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : जेव्हा आयोजकांच्या हातून मुख्यमंत्री माईक हिसकावून घेतात… असा मथळा वाचल्यावर तुम्हाला वाटलं असणार, पुन्हा एकदा भाषण करायला मुख्यमंत्र्यांनी माईक घेतला असणार. असंच वाटलं ना सुरुवातीला? पण तसं नाहीय. मुंबईतील कांदिवलीत घडलेला हा म्हटलं तर रंजक, म्हटलंतर जबाबदारीपूर्ण असा प्रसंग आहे.

त्याचं झालं असं की, गुजराती समाजाचा पारंपरिक गाण्यांच्या ‘रंग कासुम्भ डायरों’ या कार्यक्रमाचं आयोजन चारकोपमधील भाजप आमदार योगेश सागर यांनी केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उपस्थिती लावली. अगदी रात्र झाली तरीही ते कार्यक्रमाला जाऊन दिलेला शब्द पाळला. मात्र, मुख्यमंत्री पोहोचले रात्री 10.45 वाजता. त्यामुळे अर्थात नियमानुसार या वेळेनंतर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वगैरे वाजवण्याची परवानगी नाहीय.

कार्यक्रमाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री व्यासपीठावर गेले. त्यावेळी भाजप आमदार योगेश सागर सगळ्यांचे आभार मानत होते. मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दलही ते आभार मानत होते. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांनी योगेश सागर यांच्या हातून माईक हिसकावून घेतला. त्यावेळी काही क्षण सगले आवाक् झाले. पण नंतर मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

आमदार योगेश सागर यांच्या हातून माईक हिसकावून घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “मी गृहमंत्री सुद्धा आहे. त्यामुळे मी नियम तोडू शकत नाही. पुढच्या दोन मिनिटात तुम्हाला माईक बंद करावं लागेल. त्यामुळेच मी तुमच्याकडून माईक हिसकावून घेतला आहे.” मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा एकच गजर केला आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे जयघोष सुरु केला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘रंग कासुम्भ डायरों’ या कार्यक्रमातील गायकांचेही अभिनंदन केले आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

दरम्यान, त्यानंतर टीव्ही 9 मराठीने आमदार योगेश सागर यांना गाठून विचारले की, साऊंड परमिशन तर 10 वाजेपर्यंत असते, मग तुमचा कार्यक्रम त्याहीपुढे कसा चालला? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ख्रिसमस 12 वाजेपर्यंत सेलिब्रेट केली जाते, त्यामुळे या कार्यक्रमासाठीही आम्ही खास परवानगी घेतली आहे.

पाहा व्हिडीओ :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें