धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे…मनसेचा मोदींच्या जिव्हारी लागणारा वार

Sandeep Deshpande on Dharmendra Pradhan: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सध्या काहूर उठले आहे. सरकारची भूमिका स्पष्ट झाल्याने वातावरण तापलं आहे. जोपर्यंत प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे CJP ने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मनसेने असा जिव्हारी लागणारा वार केला आहे.

धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे...मनसेचा मोदींच्या जिव्हारी लागणारा वार
संदीप देशपांडे, धर्मेंद्र प्रधान, अभिजीत दिपके, नरेंद्र मोदी
| Updated on: Jul 25, 2026 | 9:08 AM

Sandeep Deshpande on Dharmendra Pradhan: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला आहे. तर कॉक्रोच जनता पार्टीने राजीनाम्याशिवाय माघार घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाच नारा दिला आहे. इतक्या परीक्षा आणि प्रश्नपत्रिका फुटल्या असताना जबाबादारी निश्चित करणे आवश्यक असल्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. देशभरात आंदोलनाचे लोण पसरले आहे. मुंबईत सध्या मनसे आणि उद्धव सेना सक्रिय झाली आहे. उद्या CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. तर त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

धर्मेंद्र वाचवायला कुठे निघालात?

“पंतप्रधान महोदय तुमची नाटक आणि नाटकीय व्हिडिओ बस्स झाले तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर जनता पंतप्रधानांचा राजीनामा घेईल.धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे निघालात.” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्याचा पंतप्रधान का प्रयत्न करत आहेत, असा सवाल विचारला आहे. मोदी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची बाजू मांडत आहेत. त्याला देशपांडे यांनी नौटंकी म्हटलं आहे. असे व्हिडिओ अपलोड करणे बंद करण्याचे आवाहन त्यांनी केली आहेत. ती सर्व नाटकीय व्हिडिओ असल्याचा देशपांडे यांनी आरोप केला आहे.

आज कोंडी फुटणार?

सोनम वांगचुक यांनी परवा मध्यरात्री उपोषण सोडले. त्यांच्यावर मोठा दबाव असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यांनी ज्या अटींवर उपोषण मागे घेतले. त्यात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची अट नव्हतीच. त्यावरून गदारोळ झाल्यावर माझ्या चारित्र्यावर संशय घेण्याची गरज नसल्याचा पलटवार सोनम वांगचुक यांनी केला आहे. सरकार सोबत डील करायचीच असती तर 26 दिवस उपोषण कशाला केले असते? असा टोला त्यांनी टीकाकारांना लगावला.

दरम्यान काल केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत CJP चे प्रवक्ते सौरभ दास यांच्या नेतृत्वात दोन सदस्यीय शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यात तीन अटींवर सहमती झाली आहे. पण प्रधान यांच्या राजीनाम्यावरून घोडे अडले आहे. चर्चा या मुद्यावर थांबली. आज पुन्हा दुपारी 3.30 वाजता बैठक होणार आहे. सरकार कॉक्रोच जनता पार्टीसोबत चर्चा करणार आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us