AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC eletion 2022 Ward 58 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 58 मध्ये कोण मारणार बाजी? चुरशीची लढत होणार

मुंबई मनपाच्या 58 क्रमाकांच्या बेस्ट नगर परिसरात काय होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत या ठिकाणाहून भाजपाचे संदीप पटेल हे विजयी झाले होते. गेल्यावेळी उमेदवारांची संख्या 19 च्या घरात होती, यावेळी ही संख्या मर्यादित झाल्यास या प्रभागातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

BMC eletion 2022 Ward 58 - मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 58 मध्ये कोण मारणार बाजी? चुरशीची लढत होणार
चुरशीची लढत?Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 3:38 PM
Share

मुंबई – मुंबई महापालिकेवर यावेळी भाजपाचाच (BJP)भगवा फडकेल, असे सांगत मुंबई भाजपाने मुंबई महापालिकेचे (BMC Election 2022) रणशिंग फुंकले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही मुंबई महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. नगरसेवक, विभाग प्रमुखांचे मेळावे शिवसेनेकडून घेतले जात आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. शिवसेना (Shivsena)आणि भाजपा या निवडणुकीसाठी सर्वस्व पणाला लावण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला राखायचाच हा शिवसेनेचा प्रयत्न असेल तर मुंबी महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. मुंबई मनपाच्या 58 क्रमाकांच्या बेस्ट नगर परिसरात काय होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत या ठिकाणाहून भाजपाचे संदीप पटेल हे विजयी झाले होते. गेल्यावेळी उमेदवारांची संख्या 19 च्या घरात होती, यावेळी ही संख्या मर्यादित झाल्यास या प्रभागातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

बेस्टनगर प्रभागाचा विस्तार

बेस्टरनगर प्रभागात प्रामुख्याने ओशिवरा बस डेपो, गोरेगाव बस डेपो, बेस्ट नगर, मोतीलाल नगर आणि सिद्धार्थनगर हे परिसर येतात. या प्रभागाच्या पश्चिमेला लिंक रोड येतो. तर पूर्वेकडे पश्चिम रेल्वे लाईनपर्यंत हा वॉर्ड आहे. या प्रभागाची लोकसंख्या 56 हजार 189 इतकी असून यात एससी लोकसंख्या 3260 तर एसटींची लोकसंख्या 365 इतकी आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत कोण कोण रिंगणात

2017 च्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून एकूण १९ जम रिंगणात होते. त्यात सहा जण अपक्ष होते. भाजपाकडून संदीप पटेल, शिवसेनेकडून राजन पाध्ये, काँग्रेसकडून सूर्यप्रकाश शेट्टीगर, राष्ट्रवादीकडून अजय विचारे, मनसेकडून वीरेंद्र जाधव, बसपाकडून सूरज एस के, रिपाईकडून सलमान खान, लोकभारतीकडून आशिष पेंडसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून प्रदीप साळवी. बविआकडून देवलाल सिंग इतक्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

2017  चे नगरसेवक

2017 साली या प्रभागातून भाजपाचे संदीप पटेल हे विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना होती.

यंदा काय होण्याची शक्यता?

2017 च्या निवडणुकीत खूप जास्त उमेदवार रिंगणात होते. एकूण 23027 मतांपैकी संदीप पटेल यांना 7153 मते मिळाली होती. शिवसेनेच्या राजन पाध्ये यांना 6606 मते मिळाली होती. मनसेच्या वीरेंद्र जाधव यांना 2756 मते मिळाली होती. काँग्रेसच्या शेट्टीगर यांना 3066 मते मिळाली होती. सपाच्या अतिउल्लाह खान यांना 1320 मते मिळाली होती. उमेदवारांची संख्या कमी झाल्यास या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

राजकीय पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.