BMC election 2022 Ward 91 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 91 मध्ये कोण मारणार बाजी? युती-आघाडीवर निकाल ठरणार?

मुंबई महापालिकेच्या 91 क्रमांकाच्या प्रभागातही ही चुरस पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. गेल्या निवडमुकीत या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगली मते घेतली होती. त्यांना मनसेच्या उमेदवाराने चांगली लढत दिली होती. यावेळी नेमकी आघाडी कशी होणार, यावर या प्रभागाचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.

BMC election 2022 Ward 91 - मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 91 मध्ये कोण मारणार बाजी? युती-आघाडीवर निकाल ठरणार?
शिवसेनेचे आव्हान रोखणार?
Image Credit source: TV 9 marathi
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Aug 20, 2022 | 7:19 PM

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीकडे (BMC Election)सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. शिवसेनेची प्रतिष्ठा या निवडणुकीत सर्वाधिक पणाला लागली आहे. मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने (BJP)गेल्या दोन अडीच महिन्यांपासून कंबर कसलेली आहे. राज्यात सत्तांतर करुन शिवसेना आणि महाविकास आघाडीला पायउतार केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही शिवसेनेला हद्दपार करण्याचा विडाच भाजपाने उचललेला दिसतो आहे. त्यादृष्टीने निरनिराळे कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे संघटनही सुरु करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही (shivsena)या निवडणुकीसाठी तयारीला लागल्याचे दिसते आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने मुंबईतील शिवसैनिक आणि संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देऊन आहेत. अशा स्थितीत ही महापालिका निवडणूक अतिशय चुरशीची ठरेल अशी चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेच्या 91 क्रमांकाच्या प्रभागातही ही चुरस पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. गेल्या निवडमुकीत या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगली मते घेतली होती. त्यांना मनसेच्या उमेदवाराने चांगली लढत दिली होती. यावेळी नेमकी आघाडी कशी होणार, यावर या प्रभागाचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.

कसा आहे प्रभाग क्रमांक 91 ?

प्रभाग क्रमांक 91 विद्यानगरी नावाने ओळखला जातो. या प्रभागात प्रामुख्याने विद्या नगरी, कोले कल्याण व्हिलेज, यशवंत नगर, पोलीस ट्रेनिंग ग्राऊंड हे महत्त्वाचे भाग आहेत. उत्तरेकडे जवाहरलाल नेहरु रोड तर पश्चिमेला वाकोला नगर असा हा वॉर्ड पसरलेला आहे. या प्रभागातील एकूण लोकसंख्या ही 55428 इतकी आहे. यात एससी 2295 तर एसटीची लोकसंख्या ही 487 इतकी आहे.

2017 च्या निवडणुकीत कोण कोण होते रिंगणात?

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 91 वॉर्डातून सात उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे सगुण नाईक, मनसेकडून यदूनाथ मोरजकर, काँग्रेसकडून शेख मोहम्मद रफीक मुस्ताना हुसेन, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिनेश अमीन, कम्युनिस्ट पार्टीकडून डिनेश हळदणकर आणि २ अपक्ष रिंगणात होते. भाजपाने या प्रभागात उमेदवार दिला नव्हता, हे विशेष,

2017 नगरसेवक कोण?

2017 शिवसेनेचे सगुण नाईक

यावेळी काय होण्याची शक्यता?

2017 च्या मुंबई महापालिक निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचे सगुण नाईक हे 7634 मते मिळवून विजयी झाले होते. एकूण मते 22184 इतकी होती. काँग्रेसच्या शेख मोहम्मद यांना 5000 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या दिनेश अमीन यांना 2953 मते मिळाली होती. मनसेनेही इथे चांगली कामगिरी केली होती. मनसेच्या यदुनाथ मोरजकर यांना 4770 मते मिळाली होती. आता या निवडणुकीत हा प्रभाग भाजपा मनसेला सोडणार का, महाविकास आघाडी एकत्र लढणार का, यावर या प्रभागाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बळही या प्रभागात चांगले आहे.

हे सुद्धा वाचा

राजकीय पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें