AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar: लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेस नेते का नव्हते?, नाना पटोलेंनी सांगितलं कारण; स्मारकाबाबतही भाजपच्या सूरात सूर

भारताची गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल निधन झालं. त्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेते आणि सेलिब्रिटी हजर होते. मात्र काँग्रेसचे बडे नेते यावेळी दिसले नाहीत.

Lata Mangeshkar: लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेस नेते का नव्हते?, नाना पटोलेंनी सांगितलं कारण; स्मारकाबाबतही भाजपच्या सूरात सूर
लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेस नेते का नव्हते?, नाना पटोलेंनी सांगितलं कारण; स्मारकाबाबतही भाजपच्या सूरात सूर
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 2:52 PM
Share

मुंबई: भारताची गान सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं काल निधन झालं. त्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्यासह देशभरातील नेते आणि सेलिब्रिटी हजर होते. मात्र काँग्रेसचे बडे नेते यावेळी दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेते लतादीदींच्या अंत्यसंस्काराला का हजर राहू शकल्या नाहीत? असा सवाल केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झालेली असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole)  यांनी त्यावर खुलासा केला आहे. आमचे अनेक नेते कोरोनाबाधित होते. त्यामुळे ते क्वॉरंटाईन असल्याने येऊ शकले नाहीत. तर मी आमच्या पाहुण्यांमध्ये एकाचं निधन झाल्याने तिकडे गेलो होतो, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्यावतीने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. आमचे बरेच नेते कोरोनाबाधित होते. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाला हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासूसुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि आमची टीम लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होती, असं पटोले म्हणाले.

मंगेशकर कुटुंबीयांना भेटणार

असलम शेख सुद्धा मुंबईबाहेर होते. वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या. शनिवार-रविवारमुळे अनेकांची दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचे योगदान एवढे मोठे आहे. आता थोड्या वेळात मी लतादिदींच्या परिवाराचे सांत्वन करायला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

स्मारक शिवाजी पार्कातच करा

लता मंगशेकर यांचं शिवाजी पार्कात स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी भाजपने केली आहे. पटोले यांनीही भाजपच्याया सूरात सूर मिसळला आहे. लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कातच झालं पाहिजे. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीचे स्मारक शिवाजी पार्कात झालं पाहिजे. लतादीदींचं स्मरण कायम राहावं यासाठी त्यांचं आंतरराष्ट्रीय पातळीचं स्मारक झालं पाहिजे, असं पटोले म्हणाले.

व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय

यावेळी त्यांनी शाहरुख खान प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या धर्मानुसार वागण्याचं प्रत्येकाला संविधानाप्रमाणे स्वतंत्र आहे. काहीजण मुद्दाहून धर्मावर टीका करून वाद निर्माण करण्याचं काम करत आहेत. दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काही लोकांनी कंत्राट घेतलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

Lata Mangeshkar: लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण नको, स्मारकाचा विचार देशानं करावा, राऊतांचा भाजपवर पलटवार; स्मारकाचा वाद तापणार?

Lata Mangeshkar: शाहरुख खानला ट्रोल करणं हा नालायक आणि बेशरमपणा आहे; संजय राऊत संतापले

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.