दाऊदचा प्रस्ताव शरद पवारांनी का नाकारला? : प्रकाश आंबेडकर

दाऊदचा प्रस्ताव शरद पवारांनी का नाकारला? : प्रकाश आंबेडकर

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम स्वत: शरण येऊन समर्पण करणार होता. तसा प्रस्ताव त्याने ज्येष्ठ वकील राम जेठमलानींद्वारे दिला होता. मात्र या प्रस्तावाकडे शरद पवारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप, प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला.

दाऊद इब्राहिम स्वत: समर्पण करणार होता, तसा प्रस्ताव राम जेठमलानींद्वारे दिला होता, या प्रस्तावाकडे शरद पवारांनी दुर्लक्ष का केलं ते स्पष्ट करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जेठमलांनी यांना दाऊद भेटला होता. त्यावेळी दाऊदने आपल्याला सरेंडर व्हायचं आहे, असं सांगितलं होतं.  ही माहिती जेठमलानी यांनी शरद पवार यांना दिली होती. ती त्यांनी तेव्हाच्या पंतप्रधांनांना दिली होती का? शरद पवार यांनी जेठमलानी यांची ऑफर का नाकारली याचा खुलासा करावा. हा प्रस्ताव 1994 चा असेल. तेव्हा अनेक वृत्तसंस्थानी याबाबतची बातमी छापली होती, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रस्तावाबाबत किती सत्यता आहे, याबाबत काहीच स्पष्ट झालं नव्हतं. पवारांनी दाऊदसंदर्भात तेव्हाच्या पंतप्रधानांशी चर्चा केली होती का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

शरद पवार यांनी जेठमलानी यांची ऑफर का नाकारली याचा खुलासा करावा. हे सर्व मिलीभगतची सरकार आहे. मोदी हे शरद पवारांच्या घरी का जातात? मोदींना माहीत नाही का शरद पवार यांनी दाऊदला सरेंडर करून घेतलं नाही? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले.

माझी अशी विनंती आहे की दाऊदला आणायचं असेल, तर कायद्याच्या चौकटीत राहून आणा, केवळ आरडा ओरडा करु नका, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला.

ज्यांनी माहिती दडवून ठेवली त्यांनाच पुन्हा सतेत बसवणार का ? हा माझा प्रश्न आहे. तेव्हाच दाऊदला सरेंडर केलं असतं, तर पुढचे बॉम्बस्फोट झाले नसते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आपण दाऊद द्या, दाऊद द्या असं सतत बोलत असतो. आपली अवस्था आज भिकाऱ्यासारखी झाली आहे. तेव्हाच दाऊदने सरेंडर केलं असतं, तर पुढचे बॉम्बस्फोट झाले नसते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

VIDEO:

Published On - 1:39 pm, Tue, 19 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI