मालिका पाहता-पाहता जेवण महागात, चिकनचा तुकडा थेट अन्ननलिकेत अडकला

मुंबई : टीव्ही पाहताना जेवण करणं ही अनेकांची आवडती सवय असते. पण समोर टीव्हा आणि त्यात जेवणाकडे दुर्लक्ष झालं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण मुंबईतील घाटकोपरमध्ये समोर आलंय. जेवण करताना टीव्हीवर मालिका पाहण्यात दंग झालेल्या एका महिलेच्या घशात चिकनचा तुकडा अडकला. हा तुकडा अन्ननलिकेत गेल्यामुळे महिलेची रवानगी थेट रुग्णालयात करावी लागली. घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला […]

मालिका पाहता-पाहता जेवण महागात, चिकनचा तुकडा थेट अन्ननलिकेत अडकला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : टीव्ही पाहताना जेवण करणं ही अनेकांची आवडती सवय असते. पण समोर टीव्हा आणि त्यात जेवणाकडे दुर्लक्ष झालं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण मुंबईतील घाटकोपरमध्ये समोर आलंय. जेवण करताना टीव्हीवर मालिका पाहण्यात दंग झालेल्या एका महिलेच्या घशात चिकनचा तुकडा अडकला. हा तुकडा अन्ननलिकेत गेल्यामुळे महिलेची रवानगी थेट रुग्णालयात करावी लागली.

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला चव्हाण यांची मालिका पाहणं ही आवडती सवय. मालिका पाहताना बिर्याणीचा बेत होते. मालिका पाहत असताना त्या एवढ्या रमल्या, की तीन सेमीचा चिकनचा तुकडा त्यांच्या घशात आणि त्यानंतर अन्ननलिकेत अडकला. त्यांना श्वास घेण्यासाठीही त्रास होऊ लागला. अखेर रुग्णालयात दाखल करावं लागलं.

उर्मिला यांना कुर्ला कोहिनूर हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. घशात अडकलेले हाड पाहण्यासाठी लगेचच त्यांच्या मानेची आणि छातीची चाचणी केली. सीटी स्कॅनमध्ये अन्ननलिकेला छेद गेल्याचं दिसलं नाही. अखेर 14 तासानंतर तज्ञ डॉक्टरांनी हा तुकडा काढण्यात यश मिळवलं.

कोहिनूर हॉस्पिटलमधील ईएनटी आणि हेड अँड नेक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले यांनी ही शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती. कारण, घशात अडकलेले हाड दोन्ही बाजूने टोकदार होते आणि अन्ननलिकेच्या मुखाशी ते आडव्या स्थितीत अडकले होते. एण्डोस्कोपिक मार्गदर्शनाखाली हे हाड चिमट्याने बाहेर काढण्यात आले. ही प्रक्रिया करताना अत्यंत काळजी घेण्यात आली, जेणेकरून अन्ननलिकेला धोका पोहोचू नये.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.