तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन…भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Bhoodan Movement Land: भूदान चळवळ ही भारतीय इतिहासातील मोठी घटना आहे. या काळात अनेक जमिनी श्रीमतांनी, जमीनदारांनी दान केल्या. आता त्या जमिनीविषयी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो लोकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन...भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय
भूदान चळवळ भूदान यज्ञ मंडळ
Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: May 09, 2026 | 1:31 PM

Bhoodan Movement Land: भूदान यज्ञ मंडळ गठीत करण्याचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. विनोबा भावे यांच्या काळात लाखो जमिनी जमीनदार आणि श्रीमंतांनी दान केल्या होत्या. महाराष्ट्रात भूदान मंडळाची लाखो एकर जमीन आहे. भूदान चळवळीत दान मिळालेल्या जमिनींचा शोध घेऊन त्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी भूदान यज्ञ मंडळ गठीत करण्यात आले आहे.

भूदान यज्ञ मंडळाची स्थापना

राज्य सरकारने भूदान यज्ञ मंडळाची स्थापना केली आहे. खामगावातील टिळक राष्ट्रीय विद्यालयातील रमेश दाणेंची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यवतमाळचे एकनाथ डगवार यांची सचिव पदी वर्णी लागली आहे. भूदान मंडळ हे जमिनींचे वाटप व व्यवहारावर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्रात भूदान मंडळाकडे लाखो एकर जमीन आहे. अद्यापही हजारो एकर जमीन शोधण्याचे मंडळासमोर आव्हान आहे. वाटप केलेल्या जमिनीचा वापर शेतीसाठी होतोय का? याची पाहणी करायची जबाबदारी मंडळाची आहे. याउलट भूदान चळवळीत दान मिळालेल्या जमिनींचा शोध घेऊन त्याचे वाटप करण्याची सुद्धा मंडळाची जबाबदारी आहे.

काय आहे भूदान चळवळ व भूदान यज्ञ मंडळ?

भूदान यज्ञ मंडळ ही आचार्य विनोबा भावे यांनी १८ एप्रिल १९५१ रोजी सुरू केलेल्या भूदान चळवळींतर्गत दान मिळालेल्या जमिनींचे व्यवस्थापन आणि भूमिहीन शेतकऱ्यांमधील वितरणासाठी स्थापन केलेली संस्था आहे.

या मंडळाचा मुख्य उद्देश श्रीमंत जमीनदारांकडून स्वेच्छेने जमीन मिळवून सामाजिक-आर्थिक असमानता कमी करणे आणि गोरगरीब भूमिहीनांना स्वतःची जमीन मिळवून देण्याचा आहे.

आचार्य विनोबाजींनी एप्रिल १९५१ मध्ये देशभर पदयात्रा करून सुरू केलेल्या भूदान यज्ञ चळवळीच्या माध्यमातून ४१ लाख ७७ हजार ७५२ एकर जमिनी मिळवली होती.

देशातील ५ लाख ७४ हजार १६१ भूस्वामींनी आपली जमिनी विनोबाजींच्या या यज्ञात दान दिली होती.

देशात ३ लाख १७२४ भूमिहिन दलित पीडित लाभार्थींना यापैकी ८ लाख ६८ हजार ७६३ एकरचे वाटप करण्यात आले होते.

उर्वरित जवळपास ३३ लाख एकर जमीन कुठे आहे, ज्यांना जमीन वाटप झाली त्यांनी तिचे काय केले, इत्यादीचा शोध घेण्यासाठी प्रत्येक राज्यात भूदान यज्ञ मंडळ स्थापन झाले आहे.

Follow Us