उद्धव ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, शिवसैनिकांकडून तरुणाचं मुंडण

उद्धव ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, शिवसैनिकांकडून तरुणाचं मुंडण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने, शिवसैनिकांनी एकाला बेदम मारहाण केली आहे.

सचिन पाटील

|

Dec 23, 2019 | 4:55 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने, शिवसैनिकांनी एकाला बेदम मारहाण केली आहे.  हिरामणी तिवारी असं मारहाण झालेल्या फेसबुक युजरचं नाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने शिवसैनिकांनी हिरामणी तिवारींचे केस कापून चक्क टक्कल करत, अवहेलना केली. काल दुपारी ही घटना घडली.

हिरामणी तिवारी वडाळ्यातील रहिवाशी आहे. हिरामणीने मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट त्यांच्या घराकडे कूच केली. इतकंच नाही तर हिरामणी यांना मारहाण करुन, त्याचे केस कापण्यात आले.

उद्धव ठाकरे यांनी जामिया विद्यापीठातील मारहाणीची तुलना जालियावाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्याविरोधात हिरामणीने फेसबुकवर पोस्ट लिहित, उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकला होता.

या पोस्टने चिडलेल्या शिवसैनिकांनी हिरामणी तिवारीला मारहाण करुन, त्याचे केस कापले. या कृत्यामुळे परिसरात एकच चर्चा सुरु होती. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही पक्षांना 149 ची नोटीस पाठवली आहे.

हिरामणी तिवारी हे बजरंग दल, विश्वहिंदू परिषद यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगतात. दादरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमाला हिरामणी तिवारींनी हजेरी लावली होती.

“काल दुपारची ही घटना आहे. 19 तारखेला मी एक कमेंट केली होती. मुख्यमंत्र्यांनी जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना जालियावाल हत्याकांडाशी केली होती. ती अत्यंत चुकीची होती. त्याविरोधातच मी फेसबुकवर कमेंट केली होती. काल 20-25 शिवसैनिकांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली, तसं माझे केस कापले”, असं हिरामणी तिवारी यांनी सांगितलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें