AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले

धारावीतील सायन PNGP कॉलनीत रात्री झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागली. नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमधील अनेक सिलेंडर स्फोट झाले. शंभर मीटर परिसरातील वाहने जळून खाक झाली. जीवितहानी झाली नाही, पण मोठे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांनी 283 सिलेंडर जप्त केले आहेत आणि कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भयानक ! नो पार्किंगमध्ये उभा केला सिलिंडरचा ट्रक, एकामागोमाग एक स्फोटाने मुंबईतकर हादरले
सिलिंडर स्फोट
| Updated on: Mar 25, 2025 | 10:00 AM
Share

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नौ पार्किंगमध्येच पार्क करण्यात आला होता. आणि रात्रीच्या सुमारास त्या ट्रकमधील एका सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे ट्र्कमधील इतर सिलेंडर्सचाही एकामागोमाग स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. एकूण 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा भडका उडाला आणि आजूबाजूच्या शंभर मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्या तसेच ट्रकही आगीत भस्मसात झाले. 24 तासांपूर्वी भडकलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात उडलेले सिलेंडरचा शोध घेऊन सिलेंडर वर पाणी मारत कुलिंग करायचं काम सुरु आहे.

मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण; नागरिक घर सोडून सुरक्षित ठिकाणी धावले.

8 जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध पार्किंग करणाऱ्या इतर 7 ते 8 जणांवर वेगवेगळ्या कलमंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक बेकायदेशीर डबल पार्किंगमध्ये उभा असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या सिलिंडर ट्रकच्या व्यतिरिक्त आणखी काही गाड्या बेकायदेशीर पार्किंगमध्ये होत्या त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तसेच गॅस सिलिंडर सप्लाय करणारे निनाद केळकर आणि इतर वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला असून या रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगसाठी पैसे घेणारे तरबेज शेख आणि जब्बार शेख दोघांनाही पोलिसांनी आरोपी बनवले.

नो पार्किंगमध्ये सिलिंडरची गाडी लावल्याने नागरिकांचा जीव धोक्यात 

मिळालेल्या माहितीनुसार, सायन PNGP कॉलनीत काल रात्री झाला सिलेंडर स्फोटाची भीषण घटना घडली. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आयसर गाडीत मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवलेले होते, त्यातील एकाचा स्फोट झाल्यामुळे एकामागोमाग स्फोटांची मालिका सुरू झाली. त्यामुळे आजूबाजूच्या शंभर मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले आणि ट्रकही आगीत भस्मसात झाले. अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. जीवितहानी झाली नसली तर बराच परिसर जळून खाक झाला आहे. स्फोटानंतर इतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत इतर गाड्या लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून 283 सिलेंडर पोलिसांनी जप्त करून धारावी पोलिस ठाण्यात हलवले आहेत. नेचर पार्क परिसरात अजूनही सिलेंडर असण्याची शक्यता; शोधमोहीम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, त्यामागचे कारण शोधण्यासाठी फायर ब्रिगेड आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

रात्रीच्या वेळेस सिलेंडरच्या एकामागोमाग स्फोटांमुळे कानठळ्या बसवणारा आवाज झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मनात दहशत माजली. लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्व जण जीव मुठीत धरून जगत होते. सध्या संपूर्ण परिसरातील नागिरकांच्या मनात भीती असून लोकांनी त्यांचं राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली आहे. स्फोट झालेल्या गाडीची अवस्थाही अतिशय भयानक आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.