मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआतच ट्विस्ट! ठाकरे गटाचा उमेदवार मैदानात, तरीही पवारांच्या राष्ट्रवादीने भरला अर्ज; अधिकृत उमेदवार कोण?

Marathwada Graduates Constituency News: महाविकास आघाडीत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआतच ट्विस्ट! ठाकरे गटाचा उमेदवार मैदानात, तरीही पवारांच्या राष्ट्रवादीने भरला अर्ज; अधिकृत उमेदवार कोण?
| Updated on: Oct 06, 2026 | 8:46 PM

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी तर महाविकास आघाडीत अधिकृत उमेदवारीवरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांनी पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रतापसिंह पाटील शरद पवार पवारांच्या धाराशिव राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने ठाकरे शिवसेनेच्या वतीने काल दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचा बी फॉर्म लावून प्रतापसिंह पाटलांनीही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे. मीच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असल्याचा प्रतापसिंह पाटील यांनी दावा केला आहे. यामुळे आता निवडणुकीला रंगत आली आहे.

प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपे, माजी खासदार फौजी खान, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार संजय वाघचौरे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, युती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांची उपस्थिती होती. ठाकरे शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावे प्रतिदावे होत असल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबत सस्पेन्स कायम आहे. याबाबत राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...

राजेश टोपे म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्रच आहे. माझ्या बाजूला प्रतापसिंह पाटील आहेत. हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अर्ज भरला आहे. त्यांचे बंधुराज सुद्धा आमदार आहेत. शिक्षण क्षेत्रात चांगलं काम असलेल्या घरातील ते उमेदवार आहेत. अतिशय चांगला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाविकास आघाडीने दिला आहे.

ते म्हणाले की, शिवसेनेचा जो उमेदवार उभा आहे तो निश्चितपणे उमेदवारी अर्ज मागे घेईल. कदाचित ते समन्वयाच्या अभावामुळे उभे राहिले असतील. प्रकाशराव पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. ते निवडणूक लढवतील आणि विजयी होतील असं मला शंभर टक्के विश्वास आहे. काल मला आमच्याही पक्षाच्या काही नेत्यांचे फोन आले होते. त्यांनी सांगितले की, आम्ही चर्चा करतोय ठाकरे साहेबांसोबत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना समजून सांगून फॉर्म मागे घेतला जाईल. अशा प्रकारचा सूतोवाच काल जयंत पाटील यांनी केला आहे.

राजेश टोपेंनी सांगितले की, अशा पद्धतीने छोट्याही मताचे विभाजन होऊ नये या पद्धतीची काळजी आम्ही घेत आहोत. प्रतापसिंह पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. निश्चितपणे आहेत असं माझं मत आहे आणि तेच खात्रीलायक राहील असं माझं अंतिम मत आहे. मतदार हा जागृत आहे, मतदारांना चांगला वाईट उमेदवार करतो बाकीच्या गोष्टी कळतात, असं ते म्हणाले. तर आता यावर प्रतापसिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतापसिंह पाटील म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक प्रश्न आहेत. राज्यस्तरीय मीटिंग चालू आहे. दोन दिवसात निर्णय समोर येईल. 100% राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचा अधिकृत उमेदवार असेल. लोकशाहीत सगळ्यात मोठे शस्त्र असते मतदान. ते अस्त्र 22 तारखेला वापरणार आणि 23 तारखेला 100% चा आवाज दिसेल. शेवटचे दोन दिवस आहेत. वरच्या लेव्हलच्या विषय आहे असं काही होणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us