AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मविआचा येत्या रविवारी 1 तारखेला सरकार विरोधात जोडे मारो मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडी आणखी आक्रमक झाली आहे. मुंबईत येत्या रविवारी 1 तारखेला सरकार विरोधात जोडे मारो मोर्चाची घोषणा महाविकास आघाडीनं केली आहे.

मुंबईत मविआचा येत्या रविवारी 1 तारखेला सरकार विरोधात जोडे मारो मोर्चा
निवडणुकांची घोषणेआधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही जागा वाटपाचीही घोषणा होऊ शकते. महायुती बद्दल बोलायचं झालं तर 225 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. पुढच्या 2 दिवसांत मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजित पवार सर्व 288 जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब करु शकतात. कारण पहिली यादी 3 ऑक्टोबरला घटनेस्थापनेच्या दिवशी येण्याची शक्यता आहे.
| Updated on: Aug 28, 2024 | 9:19 PM
Share

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, आता महाविकास आघाडी सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यानंतर रविवारी 1 सप्टेंबरला मुंबईत हुतात्मा स्मारकापासून ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चाची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरुनही महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तर शिवरायांच्या पुतळ्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. आता पुन्हा टेंडर काढून घोटाळा करतील, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, शिवरायांच्या पुतळा कोसळला त्यावरुन माफी मागितली आहे. तसंच दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावरही कडक कारवाईचं आश्वासन दिलं. 4 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र 9 महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला. शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटीलवर गुन्हा दाखल झाला. पण ते दोघेही फरार आहेत. त्यावरुन बच्चू कडूंनी पुतळ्याचं अनावरण करणाऱ्यांनी उठाबशा काढाव्यात अशी टीका केली आहे.

बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेवरुन महाविकास आघाडीनं बंदची 24 तारखेला बंदची घोषणा केली पण हायकोर्टाच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला. त्याऐवजी निषेध आंदोलन महाविकास आघाडीनं केला. आता पुन्हा शिवरायांच्या पुतळ्यावरुन सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीनं 1 तारखेला जोडे मारो आंदोलन हाती घेतलं आहे.

दरम्यान आज शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे आणि आदित्य ठाकरेही राजकोट किल्ल्यावर आले होते. ठाकरे आणि राणे समर्थक यांच्याच आधी घोषणाबाजी झाली आणि नंतर राडा झाला. मालवणमध्ये जो राडा झाला, त्या दरम्यान खासदार नारायण राणेंचा संताप पोलिसांवरच उमटला. मध्यस्थी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटीलही पुढे सरकारवले आणि काही वेळानंतर, अखेर पोलिसांनी नारायण राणे, निलेश राणेंसह कार्यकर्त्यांना रोखलं आणि मुख्य मार्गानंच आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्याच्या बाहेर काढलं.

Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?
Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?.
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?.
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका.
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली.
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?.
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर.
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले.
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले....
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात...
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात....