AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचे नेते एकच…, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर नागेश पाटील आष्टीकरांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून चर्चेला उधाण आलं आहे. त्यावर आता आष्टीकरण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आमचे नेते एकच..., एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर नागेश पाटील आष्टीकरांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Nagesh Patil AshtikarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 6:23 PM
Share

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळालं, अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये पक्षप्रवेश केला. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला. शिवसेना ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शिवेसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यातच सध्या आता ऑपरेशन टायगरची देखील चर्चा आहे. दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.  यावर आता नागेश पाटील आष्टीकर याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नेमकं काय म्हणाले आष्टीकर  

आज नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी मतदार संघातील वडगाव इथल्या ट्रॅफिक समस्येबाबत एकनाथ शिंदे यांना आज पत्र दिलं आहे, त्यांची भेट घेतली आहे, असं स्पष्टीकर या भेटीवर आष्टीकर यांनी दिलं आहे. दरम्यान काही प्रसार माध्यमांनी अशा देखील बातम्या चालवल्या की आष्टीकर यांना शिंदेंनी बंगल्यावर तब्बल पाऊल तास वाट पहायला लावली, या बातमीवरून देखील आष्टीकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

‘ काहींनी  बातम्या चालवल्या की मला पाऊण तास बंगल्यावर थांबवण्यात आलं. आम्ही विरोधी पक्षातले खासदार आहोत, त्यामुळे ते आम्हाला लगेच बोलवतील अशातला काही भाग नाही. त्यामुळे त्यांनी जेव्हा मला बोलावलं तेव्हा मी गेलो आणि ते पत्र दिलं. ही भेट विकास कामासंदर्भात होती, ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही, आणि जर असेल तर निदान आम्हाला तरी सांगा म्हणजे आम्ही आमची भूमिका मांडू, मला जर जायचं असेल तर मी सांगून जाईन. या नुसत्या चर्चा आहेत, या चर्चा घडवून आणल्या जात आहेत, यामध्ये कुठलंही तथ्य नाही.  आमचे नेते एकच उद्धव ठाकरे आहेत,’ असंही यावेळी आष्टीकर यांनी म्हटलं.

Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा