Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचं दिलासादायक चित्र, 5 हजारच्यावर बेड उपलब्ध

एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण होत होती. बेड मिळत नव्हते. मात्र, आता लाट ओसरत असताना काहीसा दिलासा मिळायला सुरवात झाली आहे

Nagpur Corona | नागपुरात कोरोनाचं दिलासादायक चित्र, 5 हजारच्यावर बेड उपलब्ध
corona Cases
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:39 AM

नागपूर : नागपुरात कोरोनाचं दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण होत होती. बेड मिळत नव्हते. मात्र, आता लाट ओसरत असताना काहीसा दिलासा मिळायला सुरवात झाली आहे (Nagpur Corona Virus Update Cases Decreases More Than 5 Thousands Beds Are Available).

नागपुरात 5 हजारच्यावर बेड उपलब्ध

सध्या नागपुरात बेड उपलब्ध व्हायला लागले आहेत. नागपुरात 7 हजार 754 बेड पैकी 5 हजारच्यावर बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा सुद्धा आता उपलब्ध होत असल्याने नागपूरकरांना दिलासा मिळायला सुरवात झाली आहे. रुग्णालयावरील ताण कमी झालाय. मात्र, महापालिका कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता बघता बालकांसाठी कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करणार असून आता प्रशासनाने तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची तयारी सुरु केली आहे.

नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून नवीन कोरोना रुग्ण संख्या सुद्धा 500 च्या खाली आली आहे. तर, मृत्यूचं प्रमाणंही कमी झाल्याने नागपूरला दिलासा मिळायला सुरवात झाली आहे. तरी अजून संकट टळलेलं नाही तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने त्यासाठी सगळ्यांनीच सज्ज राहण्याची गरज आहे.

नागपुरात कोरोनाची लाट ओसरायला सुरुवात

नागपुरात कोरोनाची लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. नागपुरात गेल्या 24 तासांत 470 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद झाली आहे. तर तब्बल 1,981 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 14,145 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर नागपुरातील एकूण रुग्ण संख्या 4,72,011 वर पोहोचली आहे. तर एकूण बरं झालेल्या रुग्णांची संख्या 4,52,341 इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 8,822 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

लहान बालकांसाठी 200 खाटांचे रूग्णालय सुसज्ज ठेवा – देवेंद्र फडणवीस

कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात लहान बालकांसाठी 200 खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला केली. याशिवाय, म्युकरमायकोसिसच्या स्थितीचा सुद्धा त्यांनी या बैठकीतून आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी काल एक बैठक नागपूर महापालिकेचे अधिकारी, महापौर आणि अन्य लोकप्रतिनिधींसोबत नागपूर महापालिकेत घेतली.

पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी 200 खाटांचे एक रुग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे रुग्णालय उभारताना विविध वयोगट विचारात घेण्यात यावेत. अगदी लहान बालके असल्यास त्यांच्या पालकांची व्यवस्था सुद्धा करावी लागेल. प्रत्येक वयोगटाच्या विविध गरजा लक्षात घेऊन याची रचना करावे लागेल, असे सांगताना त्यांनी अनेक उपयुक्त सूचना केल्या.

Nagpur Corona Virus Update Cases Decreases More Than 5 Thousands Beds Are Available

संबंधित बातम्या :

रुग्णालयांमध्ये लहान मुलांसोबत पालकांचीही व्यवस्था हवी, नागपुरात फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना

मोठी बातमी : नगर, कोल्हापूर, बीड, नागपूर, महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांशी मोदींचा संवाद

नागपुरात 10 झोनमध्ये 6 हजार सुपर स्प्रेडर्सची तपासणी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेचं पाऊल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.