AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-01 आणि प्रभाग क्रमांक -02 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!

Nagpur Municipal Corporation NMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : 2017 साली नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली होती.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-01 आणि प्रभाग क्रमांक -02 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!
nagpur municipal corporation election result liveImage Credit source: nagpur municipal corporation election result live
| Updated on: Jan 16, 2026 | 12:54 PM
Share

NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणा आणि कोणाचा दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत वॉर्ड क्रमांक एक  आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात सध्याची स्थिती काय आहे?

नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपाने मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण दहा जागांवर विजय झाला होता. शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला होतो. राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष पक्षाला एक जागा मिळाली होती.

सध्याचे जागावाटप कसे आहे?

नागपूर महानगरपालिकेत भाजपा एकूण 143 जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एकूण 8 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकूण 96 जागा लढवत आहे. दुरीकडे काँग्रेस पक्षाने एकूण 151 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ठाकरे गटानेही 56 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी 79 जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेही 75 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यावे मनसेनेही 22 जागा लढवण्याचे ठरवले आहे. एमआयएम पक्षाने 3 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बसपा हा पक्ष एकूण आठ जागा लढवत आहे.

2017 साली वॉर्ड क्रमांक एक मध्ये कोणाचा विजय?

वॉर्ड क्रमांक एकमध्ये एकूण चार जागा आहेत. यातील पहिल्या जागेवर भाजपाचे रमेश धनविजय महेंद्रप्रसाद यांचा विजय झाला होता. दुसऱ्या जागेवरही भाजपाच्याच सुषमा संजय चौधरी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या जागेवर प्रमिला प्रीतम मथराणी विजयी झाल्या होत्या. तर चौथ्या जागेवरदेखील विरेंद्र घनश्यामदास कुकरेजा हे विजयी झाले होते.

वॉर्ड क्रमांक 2 मध्ये कोणाचा विजय झाला?

प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेसच्या भावना संतोष लोनारे विजयी झाल्या होत्या. दुसऱ्या जागेवरही काँग्रेसचेच दिनेश बसंतलाल यादव हे विजयी झाले होते. तिसऱ्या जागेवर काँग्रेसच्या नेहा राकेश निकोसे विजयी झाल्या होत्या. चौथ्या जागेवरदेखील काँग्रेसेच मनोज दशरथ सांगोले हे विजयी झाले होते.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नागपूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?