AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर-नागभीड ब्रॉड गेज मार्ग लवकर पूर्ण होणार, या तारखेला होणार लोकार्पण

नागपूर येथील नागपूर ते नागभीड या १०६ किलोमीटरच्या नॅरो गेज लोहमार्गाचे रुपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या मार्गाचे लवरकरच लोकार्पण होणार असल्याची माहीती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

नागपूर-नागभीड ब्रॉड गेज मार्ग लवकर पूर्ण होणार, या तारखेला होणार लोकार्पण
NAGBHIR RAILWAY STATION
| Updated on: Jul 22, 2025 | 6:19 PM
Share

नागपूर ते नागभीड या १०६ किलोमीटरच्या नॅरो गेज लोहमार्गाचे रुपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्याचे काम वेगाने पूर्ण होत आहे. हा मार्ग दिवाळीपूर्वी ईतवारी ते उमरेड या ५१ किमी मार्गाच लोकार्पण होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयात बोलावलेल्या महारेल कार्पोरेशनच्या कामाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला महारेल कार्पोरेशनचे उपाध्यक्ष जैस्वाल, परिवहन विभागाचे उपसचिव किरण होळकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले , नागपूर जवळील ईतवारी स्थानकापासून नागभीडपर्यंत सुमारे १०६ किलोमीटरचा नॅरो गेज लोहमार्ग ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित करण्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश महारेल कार्पोरेशनला दिले आहेत. त्यापैकी ईतवारी ते उमरेड या ५१ किलोमीटरच्या लोहमार्गाचे लोकार्पण दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, या लोहमार्गाच्या नुतनीकरणामुळे १२-१४ छोट्या मोठ्या गावांना लोहमार्गाने नागपूर सारख्या महानगराशी जोडता येईल असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करा

साल २०१६ मध्ये महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त भागीदारीतून महारेल कार्पोरेशन या संस्थेची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये राज्य शासनची आर्थिक भागीदारी आहे, ते रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी महारेल कार्पोरेशनवर आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला ” रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र ” हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील सर्व रेल्वे फाटकाचे रूपांतर रेल्वे उड्डाणपूलांमध्ये करण्याची मोठी जबाबदारी महारेल कार्पोरेशनवर टाकण्यात आली आहे. हे रेल्वे उड्डाणपूल देखील गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी महारेल कार्पोरेशनला दिल्या आहेत.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.