नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, प्लास्टिक बॅगेत भरलेला 28 किलो गांजा जप्त

नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांनी गांजा तस्करी उघड केली आहे. (Nagpur Police seized 28 kg marijuana) 

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, प्लास्टिक बॅगेत भरलेला 28 किलो गांजा जप्त
Nagpur Police

नागपूर : नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांनी गांजा तस्करी उघड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 28 किलो गांजासह एक कार आणि दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. झारखंडवरुन ही गांजा तस्करी केली जात आहे. (Nagpur Police seized 28 kg of marijuana)

नागपूर पोलिसांनी गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आणला आहे. गिट्टी खदान पोलीस पेट्रोलिंग करत असताना झारखंड पासिंगची कार संशयास्पदरित्या फिरताना दिसली. त्यावेळी पोलिसांनी याबाबत विचारपूस केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात प्लास्टिक बॅगमध्ये गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली.

नागपूर शहर हे आता गांजा तस्करीपासून तर ड्रग्ज तस्करीपर्यंतच केंद्र बनत असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचं पोलिसांकडून होत असल्याचे कारवाईवरुन दिसून येते. (Nagpur Police seized 28 kg marijuana)

संबंधित बातम्या : 

धक्कादायक! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा

नागपुरात अज्ञातांनी पार्किंगमधल्या कार पेटवल्या, लाखोंचं नुकसान

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI