मोसमातील सर्वोच्च पातळी; नागपूर तापले, तापमान 46.2 अंश सेल्सिअसवर

प्रादेशिक हवामान केंद्र (RMC), नागपूरच्या आकडेवारीनुसार विदर्भ विभागात नागपूरमध्ये आज तापमान 46.2 तर गडचिरोली 44.2 चंद्रपूर 46.4 असे तापमान नोंदवले गेले आहे.

मोसमातील सर्वोच्च पातळी; नागपूर तापले, तापमान 46.2 अंश सेल्सिअसवर
तापमान Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 9:34 PM

नागपूर : यंदा (Monsoon)मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याचे एप्रिल महिन्यातच घोषित करण्यात आले होते. त्यानुसार 29 मे रोजी म्हणजेच 3 दिवस मान्सून केरळात दाखल झाल्याची घोषणाही करण्यात आली आणि दिल्लीसह अनेक राज्यात पावसाने अवकाळी पावसाने आपली उपस्थिती लावायला सुरूवात केली. तर राज्यातील अनेक जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस पडत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने धुंवाधार बॅटींग केली आहे. एकीकडे पावसाने आपली हजेरी लावली असताना मात्र दुसरीकडे विदर्भ विभागात नागपूर आणि चंद्रपूरमध्ये सुर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आहे. येथे प्रादेशिक हवामान केंद्र (RMC), नागपूरच्या आकडेवारीनुसार विदर्भ विभागात नागपूरमध्ये आज तापमान (Temperature) 46.2 तर गडचिरोली 44.2 चंद्रपूर 46.4 असे तापमान नोंदवले गेले आहे.

याच्याआधी गुरुवारी नागपुरात हंगामात सर्वाधिक तापमान 45 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले होते. हे सामान्य तापमानापासून जवळ तीन डिग्री अधिक होते. कमाल तापमान 46.8 अंश सेल्सिअस होते. तर विदर्भातील चंद्रपूर कमालीचा उष्मा होता. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा हा चढला होता. वर्धा आणि ब्रम्हपुरी येथे कमाल तापमान 45.4 आणि 45.3 डिग्री सेल्सियस नोंदवले गोले होते. गोंदिया आणि अमरावती 44.8 डिग्री आणि 44 डिग्री सेल्सियस होते. यापूर्वी, नागपूरचे तापमान 44.8 डिग्री सेल्सियस होते जे 27 एप्रिल रोजी नोंदवले गेले होते.

अनेक भागात उष्णतेची लाट

दरम्यान सामान्य तापमानातही वाढ झाली होती. गुरुवारी, TOIने जिल्ह्यातील काही भागात ढगाळ आकाश आणि पावसानंतर तापमानात पुन्हा वाढ झाल्याची नोंद केली होती. पूर्व विदर्भात कमी पावसामुळे तापमानाचा पारा वाढत असल्याचे समोर आले होते. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र (RMC),नागपूरच्या आकडेवारीनुसार गुरुवारी प्रदेशातील अनेक भागात उष्णतेची लाट दिसून आली होती.

तर हवामान विभागाकडून येत्या आठवडाभरात तापमानाचा पारा चढेल असे सांगण्यात आले आहे. गोंदिया, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्मा जाणवू शकेल, असाही अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र (RMC),नागपूर विभागाने वर्तवला आहे. पण पावसाचा अंदाज अजून वर्तविण्यात आलेला नाही.

विदर्भातील दहा जिल्ह्यांपैकी पाच ‘हॉट’

विदर्भातील दहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट होती. या हॉट जिल्ह्यांमध्ये अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अनेक ठिकाणी तापमान 44 डिग्री पेक्षा अधिक होता.

यंदाच्या मोसमातील सर्वोच्च पातळी

राज्यात उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे गरम वारे, थेट उत्तरेकडून येणारे गरम वारे आणि स्थानिक कारणांमुळे तापमान वाढले होते. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तापमानाने सरासरी असलं तरी चाळीशी पार गेल्याने उकाडा जाणवत होता. विदर्भातील तापमानाची तर यंदाच्या मोसमातील सर्वोच्च पातळी गाठली होती.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.