AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : नागपूरच्या राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी का?

नागपुरात राड्याच्याआधी औरंजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावेळी जमावाकडून औरंगजेब जिंदाबाच्या घोषणा देण्यात आल्या.

VIDEO : नागपूरच्या राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी का?
aurangzeb kabar controversyImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 11:52 AM
Share

नागपुरात राड्याच्याआधी औरंजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय. गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय. दरम्यान घोषणाबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना ही घोषणबाजी झाल्याच कळतय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. टीव्ही 9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन झालं. दोन ते अडीजच्या सुमारास जमलेला जमाव गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला होता. त्यावेळी जमावाकडून औरंगजेब जिंदाबाच्या घोषणा देण्यात आल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या सगळया तणावाची सुरुवात सोमवार सकाळपासून झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा जमाव जमून गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी तिथे घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी पोलीस स्टेशनबाहेर जो जमाव होता आणि रात्रीचा जो जमाव होता, तो वेगळा होता का? याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत. पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ मिळालेत, त्यातलं काही मॅच होतय का? याचा तपास सुरु आहे. औरंगजेबाच्या कबरीवरुन वातावरण तापलं

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी याच मुद्यावरुन नागपुरात दोन गटात हिंसक संघर्ष झाला. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. नागपूरच्या महाल भागात रस्त्यावर कशा प्रकारे हिंसाचार सुरु होता, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान या हिंसाचारात जखमी झाले. त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ