नागपूर : नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कन्हान नदीवरील मुख्य जलवाहिनीला मोठं लिकेज आढळून आलं आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्ती साठी 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ओसीडब्लू ही पाणीपुरवठा करणारी संस्था आणि महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याची विनंती केली आहे. यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त शहराला पाणी पुरवठा होणार नाही. त्यात सातरंजीपुरा, लकडगंज, नेहरू नगर झोन, आशिनगर झोनमधील 24 जलकुंभाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसंच टँकरनेही पाणी पुरवठा होणार नाही. जलवाहिनीतून होणारी गळती मोठी आहे. गळती मुख्य लाईनवर असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे काम हातात घेण्यात आलं आहे. नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा ओसीडब्लूने व्यक्त केलीय. (Water supply in Nagpur will be cut off on September 2)