Nagpur Swine Flu : नागपुरात स्वाईन फ्लूचे 20 बळी?, विश्लेषण समितीच्या बैठकीत 30 ऑगस्टला ठरणार नेमकं कारण

कोरोना आटोक्यात आलं. आता स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढतोय. स्वाईन फ्लूच्या संशयितांच्या मृत्यूचा आकडा वाढतोय. विश्लेषण समितीच्या शिक्कामोर्तब झाल्यानंतर नेमकं मृत्यूचं कारण समोर येईल. अशातच स्क्रब टायफसनं पूर्व विदर्भात एंट्री केलीय.

Nagpur Swine Flu : नागपुरात स्वाईन फ्लूचे 20 बळी?, विश्लेषण समितीच्या बैठकीत 30 ऑगस्टला ठरणार नेमकं कारण
नागपुरात स्वाईन फ्लूचे 20 बळी?
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 8:45 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लू आजाराने आणखी 20 बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 30 तारखेला होणाऱ्या मृत्यू विश्लेषण समितीच्या ( Committee) बैठकीत मृत्यूचं खरं होईल स्पष्ट होईल. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात 10 स्वाईन फ्लूग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झालंय. जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 ते 25 ऑगस्टपर्यंत 346 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आलेत. नागपूर शहरात 191 आणि शहराबाहेरील 155 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद (Patient Record) झाली. मृत्यू विश्लेषण समितीनुसार, शहरात 6, ग्रामीणला 1 आणि जिल्ह्याबाहेरील 3 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय. त्यामुळं नागपुरातलं आरोग्य विभाग (Health Department) सक्रिय झालंय.

24 रुग्ण हे जीवनरक्षण प्रणालीवर

मेडिकलच्या काही अधिकाऱ्यांनी बैठकीत कागदपत्रं आणली नव्हती. त्यामुळं 16 जणांच्या मृत्यूच्या कारणांवर चर्चा झाली नाही. नक्षलवादी पांडू नरोटे याच्यासह चार-पाच मृत्यू झाले. आता 30 ऑगस्ट रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यासाठी महापालिकेचं आरोग्य विभाग आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी समन्यव साधण्यात आला. नागपूर महापालिका हद्दीत 58 आणि ग्रामीणचे 64 असे एकूण 122 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 24 रुग्ण हे जीवनरक्षण प्रणालीवर असल्याची माहिती आहे.

स्वाईन फ्लू पाठोपाठ स्क्रब टायफसची एंट्री

कोरोना आटोक्यात आलं. आता स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढतोय. स्वाईन फ्लूच्या संशयितांच्या मृत्यूचा आकडा वाढतोय. विश्लेषण समितीच्या शिक्कामोर्तब झाल्यानंतर नेमकं मृत्यूचं कारण समोर येईल. अशातच स्क्रब टायफसनं पूर्व विदर्भात एंट्री केलीय. नागपूर जिल्ह्यात दोन आणि गोंदिया जिल्ह्यात दोन स्रब टायफसचे रुग्ण आढळले. यामुळं आरोग्य विभाग खळबळून जाग झालंय. गोंदियातील स्क्रब टायफसची माहिती थेट पुण्याच्या आरोग्य विभागाकडं पाठविल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील स्क्रब टायफसचे रुग्ण कळमेश्वर आणि काटोल या भागातील आहेत. त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.