AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Polling | विदर्भातील नगरपंचायतीत 76.83, तर भंडारा-गोंदियात झेडपीत 66 टक्के मतदान, चर्चा आता कोण जिंकून येणार याची!

आता चर्चा सुरू झाली ती कोण किती मतांनी निवडून येणार याची. पण, निकालासाठी 19 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Polling | विदर्भातील नगरपंचायतीत 76.83, तर भंडारा-गोंदियात झेडपीत 66 टक्के मतदान, चर्चा आता कोण जिंकून येणार याची!
भंडारा - लाखनी तालुक्यातील घोडेझरी येथील लक्ष्मी मोतीराम नंदागवळी या वयाच्या 102 व्या वर्षी मतदार करून केंद्रातून बाहेर निघताना.
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 9:26 AM
Share

नागपूर : विदर्भातील 38 नगरपंचायतीसाठी (Nagar Panchayat)  76.83 टक्के मतदान झाले. तर भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेसाठी (Zilla Parishad) 66 टक्के मतदान झाले. अपवाद वगळता दोन्ही जिल्ह्यात शांततेत मतदान (Polling) झाले. आता चर्चा सुरू झाली ती कोण किती मतांनी निवडून येणार याची. पण, निकालासाठी 19 जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

भंडारा झेडपीसाठी 74.78 टक्के मतदान

भंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 74.78 टक्के मतदान झाले. साकोली व लाखांदूर तालुक्यांत अधिक प्रमाणात मतदान झाले आहे. तसेच तीन नगरपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात मंगळवारी जिल्हा परिषदेचे 39 गट आणि पंचायत समितीचे 49 गणांसाठी 1322 केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यात एकूण 662 उमेदवार रिंगणात होते.

गोंदिया झेडपीसाठी 73.76 टक्के मतदान

गोंदिया : जिल्ह्यात 73.76 टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या 43 गट व पंचायत समितीच्या 86 जागांकरिता मंगळवारी मतदान झाले. या निवडणुकीत उभ्या असलेल्या एकूण 631 उमेदवारांचे भाग्य मतदारांनी मतदान यंत्रांमध्ये बंद केले. दरम्यान, मुरकुडोह-3 येथील मतदान केंद्र 17 ते 18 किलोमीटर अंतरावरील धनेगाव येथे हलविण्यात आल्याने नाराज मुरकुडोह व दंडारी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

यवतमाळात 75, तर वाशीममध्ये 72 टक्के मतदान

यवतमाळ : जिल्ह्यातील बाभूळगाव, राळेगाव, कळंब, महागाव, मारेगाव व झरी जामणी या सहा नगरपंचायतींची सार्वत्रिक तर ढाणकी नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 75 टक्के मतदान झाले. 423 उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक तर ढाणकी नगरपंचायतीच्या दोन अशा रिक्त 86 जागांसाठी 435 उमेदवार रिंगणात आहे. वाशीम : मानोरा नगरपंचायतच्या 26 जागांसाठी मतदान झाले. पार पडले. यात 59 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. ओबीसी आरक्षणावरून 118 ग्रामपंचायतमधील 189 जागांसाठी जिल्ह्यात मतदान पार पडले. मानोरानगर पंचायतसाठी सरासरी 72.36 टक्के मतदान झाले.

वर्ध्यात 75 तर, गडचिरोलीत 75 टक्के मतदान

वर्धा : जिल्ह्यातील समुद्रपूर, कारंजा, आष्टी आणि सेलू नगर पंचायतीकरिता मतदान शांततेत पार पडले. यात 54 जागांसाठी सरासरी 75 टक्के मतदान झाले. रिंगणात असलेल्या 223 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. गडचिरोली : जिल्ह्यातील 9 नगरपंचायत व 46 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान मंगळवारी घेण्यात आले. पारा सात अंशांवर व कडाक्याची थंडी असतानाही मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदान 75.41 टक्के झाले, तर 46 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी 73.72 आहे.

102 वर्षाच्या आजीबाईने केले मतदान

102 वर्षांच्या लक्ष्मी मोतीराम नंदागवळी या आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील घोडेझरी गावातील रहिवासी आहेत. देवरी तालुका नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्राच्या रेहळी येथील मतदान केंद्रावर चक्क पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नगरपंचायत सडक अर्जुनी येथे आपल्या पत्नीसोबत मतदान केले. तर सुकळी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सपत्निक मतदान केले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.