AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत? 288 जागांसाठी मुलाखती?; ‘त्या’ नेत्याचा विधानाने चर्चांना उधाण

Congress Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अशातच काँग्रेस स्वबळावर लढणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेस नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत? 288 जागांसाठी मुलाखती?; 'त्या' नेत्याचा विधानाने चर्चांना उधाण
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 01, 2024 | 9:35 AM
Share

विधानसभा निवडणूक तोंडाव आहे. अशाच सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून देखील मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच काँग्रेस नेत्याने केलेल्या विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 288 विधानसभा मतदारसंघात आजपासून काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु आहेत. पण काँग्रेसचा 288 मतदारसंघांसाठीचा प्लॅन तयार आहे, असा दावा काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी केला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहे. अशातच काँग्रेसकडून 288 जागांसाठी तयारी सुरु असल्याचं कळतं आहे. त्यामुळे काँग्रेस खरंच स्वबळावर लढणार की हे मित्रपक्षांवर दबावतंत्र आहे? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

निवडणुकीसाठी मुलाखती होणार

आजपासून वेगवेगळ्या मतदारसंघात आमचे काँग्रेसचे नेते जाणार आहेत. मुलाखती घेणार आहेत. इच्छुकांचे म्हणणे ऐक्याचे आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अहवाल द्याचे आहे. 288 मतदारसंघांचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. 288 मतदारसंघात आमचे उमेदवार तयार आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुळखती घेणार आहोत. चाचपणी करतोय अहवाल करणार आहोत, असं वंजारी यांनी सांगितलं आहे.

निवडणुकीच्या आधी स्थानिक पातळीवर चर्चा झाली पाहिजे. स्थानिक लोक, उमेदवार यांचं म्हणणं ऐकायचं आहे. मविआ एकत्र आहे. शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला एखादी जागा नकोय. तर आमचा प्लॅन बी तयार पाहिजे. निकष स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचं काय म्हणणं आहे. सर्व उमेदवारांना समोर बसवून त्यांचं म्हणणं जाणून घेणं महत्वाचं आहे. महाविकास आघाडीत जागांची अदलाबदली झाली आहे. वर्ध्यामध्येही झाली आहे. त्यामुळे आमची तयारी असणं आवश्यक आहे, असं अभिजीत वंजारी म्हणाले.

नांदेडमध्ये आज मुलाखती

विश्वजीत कदम नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. घटस्थापना झाल्यानंतर मुलाखतीचा मुहूर्त निघणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे 106 उमेदवार इच्छुक आहेत. विश्वजीत कदम 10 ऑक्टोबरपर्यंत गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करणार आहेत.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा