अफगाण तालिबानच्या ताब्यात, नागपुरात राहणारे खान गुल चिंतेत, नेमकं कारण काय?

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Aug 17, 2021 | 4:55 PM

अफगाणिस्तान तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात गेलाय. त्यामुळे संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. इकडे नागपूरात राहत असलेल्या अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानात असलेल्या आपल्या नागरीकांची चिंता सतावतेय.

अफगाण तालिबानच्या ताब्यात, नागपुरात राहणारे खान गुल चिंतेत, नेमकं कारण काय?
खान गुल
Follow us

नागपूर: अफगाणिस्तान तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात गेलाय. त्यामुळे संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. इकडे नागपूरात राहत असलेल्या अफगाणी नागरिकांना अफगाणिस्तानात असलेल्या आपल्या नागरीकांची चिंता सतावतेय. 47 वर्षांचे खान गूल पाच वर्षांपासून नागपूरात राहतात, दोन महिन्यापूर्वी त्यांचे पाच मुलं आणि पत्नी नागपुरातून काबुलला गेलेय. आता त्यांचा परिवार तालिबान्यांच्या दहशतीत असल्याने खान गुल यांची चिंता वाढलीय.

नागपुरात सध्या 90 च्यावर अफगाणी नागरीक राहतात. सध्या अफगाणमध्ये तालिबानी दहशत असल्याने नागपुरात राहणारे अफगाणी नागरीक चिंतेत आहेत. नागपूरातील 42 वर्षीय हर्ज मोहम्मद आणि 10 वर्षांचा महम्मद हनीफला अफगाणिस्तानमधील आपल्या नातेवाईकांची चिंता सतावतेय.

अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात आल्यानंतर तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानमधील ज्या अफगाणी नागरीकांनी अमेरिकेसह मित्र देशांच्या सैनिकांना मदत केली, असे तीन ते चार लाख लोक आहेत. आता तालिबानी या लोकांना खबरे म्हणून मारतील, अशी भीती सुरक्षा तज्ज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलीय. सध्या तालीबान्यांच्या ताब्यात अफगानमधील सर्व एक्झिट पॅाइंट असल्याने, तिथल्या नागरिकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात पळण्याशिवाय पर्याय नाही. सध्या अफगानीस्थानमधील स्थिती अंधकारमय आहे. असंही अभय पटवर्धन म्हणाले.

स्वातंत्र्य जाणार

अफगाणिस्तानमध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे. गेली वर्ष अफगाणिस्तान तालिबानच्या कचाट्याबाहेर होता. गेल्या वीस वर्षात लोकांना, महिलांना जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते जाण्याची भीती वाटत आहे. तालिबानचं जे वागणं वीस वर्षांपूर्वी होतं. ते आताही असेल. तालिबानी शरियत लावतील, असं पटवर्धन यांनी सांगितलं.

1978 ची पुनरावृत्ती होणार ?
अमेरिका आणि नाटोच्या सैन्याला अफगाणिस्तानातील तीन ते चार लोक आहेत जे खबरे म्हणून मदत करायचे. त्यामुळे तालिबानाचे लोक त्यांना मारतील, अशी शक्यता आहे. अफगाणिस्तानातील लोक एका शहरातून किंवा दुसऱ्या शहरात पळू शकतील. जे लोक अमेरिकेला मदत करत होते त्यांच्यासाठी अमेरिकेनं काहीही केलं नाही. अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या लोकांना तालिबानच्या तोंडात दिलेलं आहे. अफगाणिस्तानी नागरिक जे अमेरिकेला मदत होते त्यांची माहिती तालिबानकडे आहे. 1978 मध्ये तालिबाननं जे केले ते केलं तेच यावेळी करतील, अशी शक्यता असल्याचं अभय पटवर्धन म्हणाले.

इतर बातम्या:

तालिबान्यांची ‘किल लिस्ट’, तीन ते चार लाख नागरिकांना अमेरिकेचे ‘खबरी’ म्हणून मारणार?

नागपूर मनपाचं पितळ उघडं, लाखो रुपये खर्चूनही सखल भागात पाणी साचलं

Afghanistan crisis Nagpur resident Afghan citizen Khan Gul facing problems due to Taliban take over

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI