Azadi Ka Amrut Mahotsav : आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा चित्ररथाला हिरवी झेंडी, केंद्रीय संचार ब्युरो नागपूरचा उपक्रम

ही मोहीम नागपूर जिल्हा व शहरात 15 ऑगस्‍ट, 2022 पर्यंत राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणा-या हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Azadi Ka Amrut Mahotsav : आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा चित्ररथाला हिरवी झेंडी, केंद्रीय संचार ब्युरो नागपूरचा उपक्रम
हर घर तिरंगा चित्ररथाला हिरवी झेंडी
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 4:39 PM

नागपूर : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत माहिती व प्रसारण मंत्रालय (Ministry of Information and Broadcasting), भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) आजादी का अमृत महोत्‍सव आयोजित करण्यात आला. हर घर तिरंगा, कोविड बुस्टर लसीकरण चित्ररथाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक हेमराज बागुल (Director Information Hemraj Bagul) यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपजिल्‍हाधिकारी हेमा बडे, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, केंद्रीय संचार ब्‍युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी अंकुश गावंडे, तहसीलदार मृदुला मोरे, श्रीराम मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते.

13 ते 15 ऑगस्टपर्यंत मोहीम

ही मोहीम नागपूर जिल्हा व शहरात 15 ऑगस्‍ट, 2022 पर्यंत राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणा-या हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तिरंगा फडकवितांना नागरिकांनी काय करावे व काय करू नये. याबाबत केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) आणि जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर यांनी तयार केलेल्या ऑडियो क्लिपद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बुस्टर लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चित्ररथ प्रत्येक तालुक्यात फिरणार

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्ती गीताद्वारे जनजागरण करण्यात येणार आहे. हे चित्ररथ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखील देशमुख, सहायक संचालक हंसराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय संचार ब्युरो, नागपूरचे तांत्रिक सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छकाय यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.