AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babanrao Taywade : आम्ही काही भांडे घासायला बसलेलो नाही, ओबीसी नेत्यांचा गेम करण्याच्या मनोज जरांगेंच्या वक्तव्याचा बबनराव तायवाडेंनी घेतला खरपूस समाचार

Babanrao Taywade on Manoj Jarange : कोणी कोणाची गेम करेल एवढी ताकद नाही, आम्ही काही भांडे घासायला बसलेलो नाही असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला. त्यांनी जरांगेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

Babanrao Taywade : आम्ही काही भांडे घासायला बसलेलो नाही, ओबीसी नेत्यांचा गेम करण्याच्या मनोज जरांगेंच्या वक्तव्याचा बबनराव तायवाडेंनी घेतला खरपूस समाचार
बबनराव तायवाडे
| Updated on: Oct 07, 2025 | 11:56 AM
Share

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला धक्का लावला तर मग ओबीसी आरक्षणाचा 1994 च्या शासन निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचे जाहीर केले. त्यांनी मध्यंतरी ओबीसी नेत्यांना ललकारले. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी त्यावर मनोज जरांगे पाटील यांना चांगलेच सुनावले. त्यांनी जरांगेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कोणी कोणाची गेम करेल एवढी ताकद नाही, आम्ही काही भांडे घासायला बसलेलो नाही असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला.

जरांगेंचे वक्तव्य बालिशपणाचे

आमच्या आरक्षणावर काही गदा आणले तर आम्ही ओबीसीचा १९९४ चा शासन निर्णय चॅलेंज करू आणि ओबीसीचे आरक्षण संपवू, असे वक्तव्य मागील दोन-तीन दिवसांमध्ये जरांगे पाटील यांनी केले. त्यांचं हे वक्तव्य बालिशपणा आहे. कारण ओबीसी समाजाला मिळालेल्या 27 टक्के आरक्षण 40 ते 42 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मिळाला आहे. 1952 पासून आरक्षण मिळण्या पेक्षा 1994 ला मिळालं. मंडला आयोगाचा अहवाल आला, आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 52 टक्के ओबीसी समाजाला मंडल आयोगानुसार 27 टक्के आरक्षण मिळालं. वारंवार दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार हे आरक्षण मिळालं, हे संपणार म्हणणे चुकीच आहे असं म्हणणं हे वक्तव्य चुकीचे आहे,असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले.

समाजाला खूश करण्यासाठी असं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप केले. त्यावर तायवाडे व्यक्त झाले. जरांगे रोज काहीतरी अशी वक्तव्य करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांनाच कळतो अशा पद्धतीने ते वागत असतात.आंदोलनकर्ता म्हणून त्यांच्या पाठीमागे मोठी जनता असताना त्यांना खुश करण्यासाठी बदनाम करण्याचं काम ते करत असतात. राजकारणात कोणी कोणाला संपवत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या ताकतीने उभा राहत असतो. समाजाला खुश करण्यासाठी असे वक्तव्य करत असतात, त्यांच्या समाजातील लोकांना खुश करण्यासाठी ते अशे वक्तव्य करत असतात, असा उत्तर तायवाडे यांनी दिले.

जीआरमुळे ओबीसीला धोका नाही

2 सप्टेंबरच्या जीआरमुळे आरक्षणाला धक्का लागला नाही, तर कुणबीच नाही तर एससी एसटी सर्व जातीचे जात प्रमाणपत्र देणे आणि वैधता तपासणी यासाठी कायदा आणि नियमावली आहे. त्यामुळे या जीआरमध्ये कुठली नवीन पद्धत नसल्याने या जीआरमुळे आरक्षणाला धोका निर्माण होत नाही, असे तायवाडे यांनी पुन्हा सांगितले.

ओबीसी नेत्यांना संपू देणार नाही

कोणी कोणाची गेम करेल एवढी ताकद नाही, आम्ही काही भांडे घासायला बसलेलो नाही भविष्य नेत्यांमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे. साडेचारशे जातींचा समाज आहे मतभेद असू शकतात मात्र मनभेद नाही त्यामुळे आम्ही कोणत्याही ओबीसी नेत्याला संपू देणार नाही. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आणि पाठीशी उभे राहू. अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप दोन्ही नेत्यांकडून थांबवल्या गेले पाहिजे आणि दुफळी निर्माण झाली ती कुठेतरी थांबली पाहिजे. जरांगे यांनी सत्तेतील सर्वच नेत्यांवर टीका केली आहे त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा नेहमीच्या स्वभाव झालेला आहे.

कुणबी प्रमाणपत्र काढणं सोप नाही

शपथपत्रासोबत वंशावळ जोडायची आहे, जोडलेली वंशावळ खरी आहे का तपासून अहवाल तहसीलदार यांना देणार आहे. शपथ पत्र हे खोटं सुद्धा ठरू शकतो आणि खोटं सादर केल्यास त्याची डबल यंत्रणा असेल आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूद शासनाकडे आहे, खोटी प्रमाणपत्र देणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत शिक्षा आहे, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले.

जमीन व्यवहार प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल, पार्थ पवारांची भूमिका काय?
जमीन व्यवहार प्रकरण, तिघांवर गुन्हा दाखल, पार्थ पवारांची भूमिका काय?.
अण्णा हजारे आक्रामक थेट काढले बारामतीचे संस्कार, नेमकं काय म्हणाले?
अण्णा हजारे आक्रामक थेट काढले बारामतीचे संस्कार, नेमकं काय म्हणाले?.
मोटारमन आंदोलनामुळे लोकल रखडल्या, ट्रॅकवरून चालणाऱ्या तिघांना उडवलं...
मोटारमन आंदोलनामुळे लोकल रखडल्या, ट्रॅकवरून चालणाऱ्या तिघांना उडवलं....
कधी जीव जाईल... शिंदेंच्या मंत्र्याकडून राऊतांच्या आजारपणाची टिंगल
कधी जीव जाईल... शिंदेंच्या मंत्र्याकडून राऊतांच्या आजारपणाची टिंगल.
राज ठाकरेंचा पॅटर्नच वेगळा, मुळशी पॅटर्न फेम पिंट्या भाईला झापलं?
राज ठाकरेंचा पॅटर्नच वेगळा, मुळशी पॅटर्न फेम पिंट्या भाईला झापलं?.
बड्या माजी क्रिकेटर्सना दणका... थेट प्रॉपर्टी जप्त, नेमकं प्रकरण काय?
बड्या माजी क्रिकेटर्सना दणका... थेट प्रॉपर्टी जप्त, नेमकं प्रकरण काय?.
शिंदेंच्या मेळाव्यासाठी रस्ते चकाचक पण काही तासात बघा काय झाली अवस्था!
शिंदेंच्या मेळाव्यासाठी रस्ते चकाचक पण काही तासात बघा काय झाली अवस्था!.
अजितदादा अडचणीत! पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटीत अन्....
अजितदादा अडचणीत! पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटीत अन्.....
नसतं धाडस आलं न् भाऊ अंगाशी... समुद्रकिनारी हुल्लडबाजी केली अन्...
नसतं धाडस आलं न् भाऊ अंगाशी... समुद्रकिनारी हुल्लडबाजी केली अन्....
खाकी वर्दी दारूच्या नशेत, मागितला 20 रूपयाचा हफ्ता, मनसेन घातला गोंधळ
खाकी वर्दी दारूच्या नशेत, मागितला 20 रूपयाचा हफ्ता, मनसेन घातला गोंधळ.