AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh : लोकप्रतिनिधींकडूनच आरोपीचं…वाल्मिक कराडसाठी स्कॅनर नि बॅनर; धनंजय देशमुखांची ती जळजळीत प्रतिक्रिया

Walmik Karad Funds : संतोष देशमुख खूनप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून मुख्य आरोपी वाल्मिक कराडसाठी काहीजण समर्थन करत आहेत. आता तर कराडच्या नावे थेट स्कॅनर आणि बॅनर बीडमध्ये फिरत आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

Santosh Deshmukh : लोकप्रतिनिधींकडूनच आरोपीचं...वाल्मिक कराडसाठी स्कॅनर नि बॅनर; धनंजय देशमुखांची ती जळजळीत प्रतिक्रिया
धनंजय देशमुख
| Updated on: Oct 07, 2025 | 11:09 AM
Share

बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची गेल्यावर्षी अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींना कौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या कटातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे समोर आले. पण बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी स्कॅनर आणि बॅनर फिरत आहे. सोशल मीडियावर वाल्मिक कराडसाठी (Walmik Karad) आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात धनंजय देशमुख यांची जळजळीत प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी याप्रकरणी लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले आहेत. या लोकप्रतिनिधींचीच फूस आरोपींच्या समर्थकांना असल्याचा मोठा आरोप देशमुख यांनी केला आहे. तर यासर्व प्रकरणात पोलिसांची बघ्याची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे.

सोशल मीडियावरुन मदतीचे आवाहन

सोशल मीडियावर संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याचा फोटो लावून वाल्मिक कराडला बाहेर काढण्यासाठी आणि त्याचे नाव, फोटो सतत सोशल मीडियावर राहण्यासाठी आर्थिक निधी गोळा करण्यासाठी एक बॅनर काल पासून फिरत आहे. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय देशमुख यांनी दसरा मेळाव्याच्या दरम्यान देखील आरोपीचे फोटो लावून पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

धनंजय देशमुखांचा मोठा आरोप

दसऱ्याच्या दिवशी तसेच गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा फोटो लावलेले बॅनर आणि स्कॅनर फिरत आहे. आरोपीचं कुठपर्यंत समर्थन करावं याचं उदाहरण बघताय आपण. जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुरुवातीपासूनच या आरोपींचं समर्थन करत आलेले आहेत त्यावर काहीही बोलत नाहीत म्हणजेच सरळ-सरळ हा देखील एक समर्थनाचा भाग आहे असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांचा रोख धनंजय मुंडेंकडे असल्याचे म्हटले जात आहे.

आरोपींवर कारवाई करा

दरम्यान हे सगळं मी जिल्हाधिकारी आणि बीडच्या एसपींना पाठवलेलं आहे. या आरोपींवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र जोपर्यंत या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत या आरोपींचं समर्थन हे असंच होत राहील अशीही प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान या स्कॅनर आणि बॅनरने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. याविरोधात पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजितदादा याविषयात लक्ष घालून आरोपींना समर्थन देणाऱ्यांविरोधात खमकी भूमिका घेतात का, याविषयीची चर्चा होत आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात भक्तीगडावर सुद्धा काही हुल्लडबाजांनी वाल्मिक कराडची पोस्टर घेऊन घोषणा दिल्याचे दिसले. त्यावरूनही वादंग सुरू आहे. आरोपींचे असे जाहीर समर्थन होत असताना पोलीस काय कारवाई करणार असा सवाल विचारला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...