Nagpur | पटोलेंचा राजीनामा मागण्याचा अधिकार बावनकुळेंना नाही; बावनकुळेंनीच काँग्रेसमध्ये यावं – सुनील केदार

Nagpur | पटोलेंचा राजीनामा मागण्याचा अधिकार बावनकुळेंना नाही; बावनकुळेंनीच काँग्रेसमध्ये यावं - सुनील केदार
सुनील केदार, पशुसंवर्धन मंत्री

सुनील केदार म्हणाले, प्रदेशाध्यक्षावर दबाव टाकण्याची संस्कृती आमच्या पक्षाची नाही. मी उमेदवार बदलासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. दबाव टाकण्याची संस्कृती भाजपात असावी, असंही सुनील केदार म्हणाले.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 13, 2021 | 12:37 PM


नागपूर : जे पक्ष सांभाळू शकत नाही ते निवडणुका कशा लढतील? असा प्रश्न उपस्थित करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर प्रहार केला होता. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यावर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुनील केदार म्हणाले, प्रदेशाध्यक्षावर दबाव टाकण्याची संस्कृती आमच्या पक्षाची नाही. मी उमेदवार बदलासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. दबाव टाकण्याची संस्कृती भाजपात असावी, असंही सुनील केदार म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसमध्ये यावं

सुनील केदार म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांना आमच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घ्यायचा असेल, तक्रार त्यांनी पक्ष बदलून आमच्या पक्षात यावं. पक्षाबाहेरच्या व्यक्तीनं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मागण्याचे काही कारण नाही. बावनकुळे यांना पटोलेंचा राजीनामा मागायचा असेल, तर त्यांनी आधी काँग्रेसमध्ये यावं. त्यानंतर अशी मागणी करावी, असंही केदार यांनी सांगितलं.

उद्या विधान परिषदेचा निकाल

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेचा निकाल उद्या, १४ डिसेंबर रोजी लागणार नाही. भाजपचा की काँग्रेसचा उमेदवार निवडूण येणार, हे उद्याच स्पष्ट होईल. लोकशाहीत निकाल भाकीत करता येत नाही. कारण हे गुप्त मतदान आहे. याचं चित्र उद्या पहायला मिळेल. माझ्या राजकारणात मी विचारांचा आणि लोकांचा विश्वास जिंकत काम करतो. मला विश्वास आहे की यावेळीही यश प्राप्त होईल, अशी अपेक्षा सुनील केदार यांनी व्यक्त केली.

१५ डिसेंबरला शंकरपटाचा निर्णय

शंकरपट सुरु करण्यासाठी राज्य सरकारने चार वर्षे प्रयत्न केले. न्यायालयात मत स्पष्ट करण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे. यात आम्ही नक्कीच यश प्राप्त करू. १५ तारखेला शंकरपटाबाबत निर्णय लागेल. न्यायालयाचा निर्णय देशासाठी असेल. न्यायालयीन लढाईत आम्हाला यश मिळेल, असंही सुनील केदार यांनी सांगितलं. दरम्यान, आता महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. पक्षाने सुचना केल्या तर नागपूर महापालिका निवडणुकीत पक्षासाठी काम करेन, असंही केदार म्हणाले.

Nagpur| आई तू सोडून का गेलीस? युवकाचा तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

Video – Nagpur | आता माघार नाही, एस कर्मचारी संपावर ठाम, जी कारवाई करायची ती करा!

Yavatmal | वणीत नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक? धूळ व प्रदूषणाची समस्या कायम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें