AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरी यांची राजकीय कोपरखळी; म्हणाले माझ्यामुळे आमदारांची होते अडचण

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांचं महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीतील मंडळी पण कौतुक करतात. गडकरी रोखठोक बोलणारे म्हणून लोकप्रिय आहेत, पण हीच मोठी अडचण असल्याचा चिमटा त्यांनी काढला. आपल्या बोलण्यामुळे अनेक आमदार, खासदार, नगरसेवकांची गोची होत असल्याचे ते म्हणाले...

नितीन गडकरी यांची राजकीय कोपरखळी; म्हणाले माझ्यामुळे आमदारांची होते अडचण
माझ्यामुळे अनेकांची अडचण -नितीन गडकरी
| Updated on: Apr 06, 2024 | 9:47 AM
Share

नितीन गडकरी भीडभाड न बाळगता स्पष्ट वक्ता म्हणून राज्यालाच नाही तर देशाला सुपरिचीत आहे. कदाचित हा सदगुण राजकारणात अडचणीचा ठरतो. पण त्याची तमा गडकरी यांनी कधी बाळगल्याचे इतक्या वर्षात तरी दिसले नाही. माझ्यामुळे अनेक खासदार, आमदार आणि नगरसेवकांची अडचण होते, असे नागपूरातील एका कार्यक्रमात ते म्हणाले. त्यांच्या या राजकीय कोपरकळीने अर्थातच हशा पिकला. या कार्यक्रमात त्यांनी विकासाची जंत्री वाचून दाखवली. सध्या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त गडकरी हे तळ ठोकून आहेत. काय म्हणाले गडकरी

आमदार-खासदाराचा मुलगा असणे गुन्हा नाही

नगर सेवकांच्या पोटातून नगर सेवक नाही , आमदाराच्या पोटी आमदार नाही, खासदारांच्या पोटी खासदार हे मला मान्य नाही.पण आमदार खासदारांचा मुलगा असणे गुन्हा नाही जनतेने मागणी केली तर जरूरर त्याला तिकीट दिली पाहिजे पण आई वडिलांच्या म्हटले म्हणून त्याला जनतेवर थोपवणे योग्य नसल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला. जनतेला हा अधिकार असल्याचे त्यांनी रोखठोकपणे सांगितले.

माझ्यामुळे होते अडचण

आपण अनेकदा सांगितले की मला चिंता नाही. माझ्या मुलाला राजकारणात आणयचं आहे म्हणून… माझ्या मुलांना सांगितलंय की, माझ्या जीवावर राजकारणात यायचं नाही. राजकारणात यायचं असेल तर भींतीवर पोस्टर लावावं लागेल. शून्यातून उभं राहावं लागेल. लोकांमध्ये जावून काम करावं लागेल. पण माझ्यामुळे अनेक नगर सेवक आणि आमदारांची अडचण होते, असा चिमटा त्यांनी काढला. बावनकुळे काही लोकांचे नाव घेत होते मी कुणाचं नाव घेत नाही त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं कशाला करायचे त्यांचा बँड वाजला आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता, मुत्तेमवार आणि नाना पटोले यांना लगावला.

विकास कामाची वाचली जंत्री

नागपुरातील गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी दूर जावं लागणार नाही, त्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुलांना रोजगार मिळणे महत्वाचे 1 लाख तरुणांना रोजगार मिळवून देऊ, असे ते म्हणाले. मी विकास काम केली. अनेक भागात रोड बांधले. नागपुरात सगळ्यात चांगले रस्ते बनले ,मी गॅरंटी देतो दोन पिढ्या खड्डे पडणार नाही. त्यामुळे तुम्ही खुश झाले तरी कॉन्ट्रॅक्टर नाराज होतात. कारण त्यांना सतत काम पाहिजे असते. त्यात त्यांचं नुकसान आहे.

नाग नदीत बोटिंगचा आनंद

मिहान मध्ये रोजगार येत आहे. खेळाचे मैदान शहरात चांगली झाली पाहिजे. चिटणीस पार्क नवीन करायचं आहे. लंडन स्ट्रीट बनविला आहे. नागपूर हे भारतात पाहिलं शहर आहे जिथे 24 बाय 7 पाणी योजना आणली ती आता 100 टक्के पूर्णत्व कडे जात आहे. अंबाझरी तलावाचे काम सुरू झाले , नाग नदीचा कचरा साफ करून ती सुंदर होत आहे.पुढच्या वेळी तुम्हाला मत मागायला येण्याच्या आधी नाग नदीत बोट चालले मी प्रवास करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हॅटट्रिक साधायची आहे

  • आता माझी सगळ्यांना विनंती आहे मला हॅट्रिक करायची आहे त्यासाठी तुम्ही बूथ वर जाऊन मतदान करा. नातेवाईक मित्रांना सांगा 75 टक्केपेक्षा जास्त मतदान करा. या शिदोरीवर हॅट्रिक साधण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
  • मी कट आउट लावणार नाही म्हटलं त्याचा अर्थ वेगळा विरोधकांनी काढला. मी जाती-पातीच राजकारण करत नाही. माणूस जाती पाती ने मोठा होत नाही. आपल्या गुणांनी मोठा होतो. आपल्याला जनतेला सुखी करायचं आहे, तुम्ही नेहमी माझ्या मागे राहिले असेच प्रेम राहू द्या, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.