AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांनी भाषणातील ‘ती’ मागणी अखेर विधान परिषदेच्या पटलावर आणली; म्हणाले, कर्नाटक व्याप्त…

आम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? हे ठेवा बाजूला. आपण काय करणार आहोत? हा आजचा प्रश्न आहे. शिवसेनेने एक ठराव केला होता. 1969 साली सीमावादावरून आंदोलन पेटलं होतं.

उद्धव ठाकरे यांनी भाषणातील 'ती' मागणी अखेर विधान परिषदेच्या पटलावर आणली; म्हणाले, कर्नाटक व्याप्त...
उद्धव ठाकरे यांनी भाषणातील 'ती' मागणी अखेर विधान परिषदेच्या पटलावर आणली; म्हणाले, कर्नाटक व्याप्त...Image Credit source: Maharashtra Assembly
| Updated on: Dec 26, 2022 | 12:25 PM
Share

नागपूर: जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश केंद्रशासित करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आता त्यांनी पहिल्यांदाच विधान परिषदेच्या कामकाजाच्या पटलावर ही मागणी आणली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या कामकाजात भाग घेत कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करण्याची मागणी केली.

उद्धव ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार, भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे विधान परिषदेत तब्बल 15 ते 20 मिनिटं बोलले. यावेळी त्यांनी सीमावादाच्या लढ्याची माहिती देतानाच या प्रश्नावर सरकारने कठोर आणि कणखर भूमिका घेण्याची मागणी केली. तसेच सभागृहात सीमावाद्यावरील लढ्याचं पुस्तक आणि एक डॉक्युमेंट्री फिल्मही दिली.

केंद्र सरकारकडे सीमावादाचा प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे का? कर्नाटकाचे मुख्यमंत्री जोरात बोलत आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी काढला आहे का? ठराव मांडणार आहात. हा ठराव काय असेल? त्याचं काय शब्दांकन केलं? सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न प्रलंबित असेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित झालाच पाहिजे, असा ठराव केलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

ठराव करायचा असेल तर हाच ठराव करावा. जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित केलाच पाहिजे. चर्चा करायचीच असेल तर धाडसाने केली पाहिजे. मुख्यमंत्री येतील न येतील. त्यांना दिल्लीतून सोडलं जाईल की नाही माहीत नाही. पण आपण हा ठराव आजच्या आजच केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सीमाप्रश्न ही जबाबदारी आहे कुणाची? केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखं वागतंय का? सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतरही कर्नाटक सरकार ज्या आग्रहीपणे त्यांची भूमिका मांडतंय तशी भूमिका आपलं सरकार मांडतंय का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

आम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? हे ठेवा बाजूला. आपण काय करणार आहोत? हा आजचा प्रश्न आहे. शिवसेनेने एक ठराव केला होता. 1969 साली सीमावादावरून आंदोलन पेटलं होतं. मी त्या आंदोलनात नव्हतो. तेव्हा मी माझ्या आईसह उपस्थित होतो. बाबरी पाडायला गेलो असं काही लोक सांगतात, तसं सीमा आंदोलनात होतो असं सांगणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

मोरारजी देसाई मुंबईत येणार होते. सीमावासियांकडून माहीम नाक्यावर त्यांना निवेदन देण्यात येणार होतं. प्रत्यक्षात काय घडले? मोरारजी देसाई यांची गाडी निघून गेली. त्यांनी इतरांना उडवले. एक फोटोग्राफर जखमी झाला. एका शिवसैनिकाच्या पोटावरून कारचं चाक गेलं. त्यामुळे जनता खवळली.

तुफान लाठीमार झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे शिवसेनाप्रमुखांना अटक झाली. तीन महिने शिवसेनाप्रमुख आत होते. मनोहर जोशी, दत्ताजी साळवी त्यांच्यासोबत येवरड्याच्या तुरुंगात होते. अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली. दहा दिवस मुंबई जळत होती. मुंबई शांत होत नव्हती. शिवसेनाप्रमुखांनी तुरुंगातून आवाहन केलं. त्यानंतर मुंबई शांत झाली, अशी आठवण त्यांनी सांगितली.

जन्म घ्यावा तर महाराष्ट्रात घ्यावा, असं कधी महाराष्ट्रात येऊन कर्नाटकाचा मंत्री बोलताना पाहिला का? जन्म घ्यावा तर कर्नाटकात असं महाराष्ट्राचे मंत्री म्हणतात. चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकात जाऊन तसे उद्गार काढले. अशा राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार? ते कसा प्रश्न सोडवणार?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.