भाजप इलेक्शन मोडवर? केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

भाजप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान नव्यानं निवड झालेले राज्यातील केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

भाजप इलेक्शन मोडवर? केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 12:57 PM

नागपूर: भाजप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान नव्यानं निवड झालेले राज्यातील केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे प्रमुख नेते चार दिवस दिल्लीत होतो. सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी करायची काम आणि दुसरीकडे पक्ष संघटन मजबूत कसं होईल, 50 टक्क्याची लढाई कशी होईल, भाजप मजबूत कशी राहिल यासंदर्भात हा दिल्ली दौरा होता, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

केंद्र सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. नव्या मंत्र्यांना त्याच्या क्षेत्रात दौरे करण्यास सांगण्यात आलंय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले . 17 ते 22 तारखे दरम्यान जनआशीर्वीद यात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजप तीन पक्षांविरोधात एकटा लढला तरी 51 टक्केची लढाई करुन आमचा पक्ष मजबूत राहिलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्लीतील बैठकीत मनसे सोबतच्या युतीचा विषय अजेंड्यावर नव्हता, असं म्हटलं आहे. तर, हा विषय स्थानिक पातळीवरचा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

नव्या केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा

राज्यात भाजप ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढणार आहे. महाराष्ट्रातील नव्याने झालेल्या चार केंद्रीय मंत्र्यांवर ‘जनआशीर्वाद यात्रे’ची जबाबदारी सोपवण्यात आलीय. नारायण राणे आणि कपिल पाटील कोकण, ठाणे मुंबईत यात्रा काढणार आहेत. तर, भागवत कराड मराठवाड्यात जनआशिर्वाद यात्रा’ काढणार आहेत.

भाजपकडून निवडणुकांची तयारी सुरु?

भाजप नेत्यांच्या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. 17 ते 22 ॲागस्ट दरम्यान महाराष्ट्रात भाजपची ही जनआशीर्वाद यात्रा असणार आहे. शिवाय दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व खासदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्यात. भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही बाब मान्य केलीय.

इतर बातम्या:

ओबीसीने ठरवलं पाहिजे जो बंगला माझा नाही, तिथं का राहायचं? पंकजांबाबतच्या प्रश्नावर जानकरांचं उत्तर

फडणवीसांना कायद्याचे पेच जास्तच माहीत, त्यांचा वकिली सल्लाही घेऊ; संजय राऊतांचा टोला

Chandrashekhar Bawankule said BJP will organised Janashirvad Yatra Union Ministers will participated

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.