ओबीसीने ठरवलं पाहिजे जो बंगला माझा नाही, तिथं का राहायचं? पंकजांबाबतच्या प्रश्नावर जानकरांचं उत्तर

ओबीसींच्या जनगणनेसाठी (OBC) मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वतः या कमिटीचे प्रमुख व्हावे, ओबीसीचा डाटा तयार केला पाहिजे, अशी सूचना महादेव जानकर यांनी केली. ओबीसींसाठी राष्ट्रीय समाज पक्ष 29 तारखेनंतर मुंबईतून राज्यभरात जनजागृती अभियान सुरु करणार आहे.

ओबीसीने ठरवलं पाहिजे जो बंगला माझा नाही, तिथं का राहायचं? पंकजांबाबतच्या प्रश्नावर जानकरांचं उत्तर
पंकजा मुंडे, महादेव जानकर फाईल फोटो

जालना : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर रोखठोक भाष्य केलं. ओबीसींच्या जनगणनेसाठी (OBC) मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वतः या कमिटीचे प्रमुख व्हावे, ओबीसीचा डाटा तयार केला पाहिजे, अशी सूचना महादेव जानकर यांनी केली. ओबीसींसाठी राष्ट्रीय समाज पक्ष 29 तारखेनंतर मुंबईतून राज्यभरात जनजागृती अभियान सुरु करणार आहे. तसेच जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा जानकरांनी घेतला आहे.

यावेळी महादेव जानकर यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव न घेता प्रश्न विचारण्यात आला.

प्रश्न- ओबीसी नेतृत्त्वाने देश गाजवलेला आहे, राज्यामधील महत्त्वाचे मुद्दे वर काढलेले आहेत, परंतु त्या नेत्यांना डावललं जातंय, आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहेत. आपल्या राज्यातील, मराठवाड्यातीलच आहे. त्यावर काय सांगाल…पक्षातून त्यांना डावललं जातंय का?

महादेव जानकर यांचं उत्तर- तो त्या पक्षाचा भाग आहे.. I am not voter of that party…I am not member of that party…मी माझ्या पक्षाचं नेतृत्त्व करतोय…रासपाचं…माझ्याकडे सर्वच पक्षाची लोकं आहे, ब्राह्मण आहेत.. मराठा आहेत, वंजारी आहेत…दलित आहेत..साळी…माळी कोळी आहेत..तो त्या पक्षाचा प्रश्न असतो…नेतृत्त्वाचं काय करायचं….एखाद्या पक्षाने कुठला डिसीजन घेतलाय, त्याबद्दल मी बोलणं योग्य नाही…आता ओबीसीने ठरवलं पाहिजे कुठल्या घरात राहायचं ते..

प्रश्न- पण त्यांच्यावर अन्याय होत असेल तर..

उत्तर- मी काय म्हणतोय, ओबीसीने ठरवलं पाहिजे जो बंगला माझा नाही, तिथं का राहायचं? बंगला ज्याने बांधलेला आहे, तोच बंगल्याचा मालक असतो ना साहेब….आम्ही भाड्याने तिथं राहतो…भाडेकऱ्याला कधीही बाहेर काढलं जातं…म्हणून आम्ही झोपडी बांधण्याचा प्रयत्न करतोय…

17 वर्ष जे आम्ही फिरतोय…I am a Machanical Engineer…गोल्ड़ मेडल इंजिनिअर आहे मी…आम्ही आमची झोपडी बांधतोय…छोटीय…आमचा नसेल खासदार आता…खासदाराचं खातंही खोलीन…आमदार आहेत माझे, जिल्हा परिषद सदस्य आहेत माझे…सभापती आहेत, नगराध्यक्ष आहेत….आता खासदाराचा कोटा झाला की माझं सर्कल पूर्ण होतंय…6 राज्यात मान्यता पाहिजे, 2 राज्यात मिळालीय…2 राज्यात मी घेतोय…आमचं सर्कल पूर्ण केलं पाहिजे…I am not Reactionery…

आपण काय करतो साहेब, त्याने दगड मारला की, मी दगड मारतो..बिल्कुल दगड नाही मारायचा…त्याने मारला तर मारु दे आपल्याला…शांततेत…पक्ष त्यांनी बनवला तर त्यांच्या अजेंड्यासाठी….तुम्ही तिथं भाड्याने राहता..भाड्यानं….मग भाड्याने राहणाऱ्या माणसाची अवस्था हीच होणार ना साहेब..

महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावरच आमदार आहे…रत्नाकर गुट्टे हा रासपाच्या तिकीटावरच आमदार आहे…

आम्ही कुणाचं बनून फिरत नाही, आम्ही आमचाच झेंडा घेऊन फिरतोय ना…झेंडा आणि दांडा आपलाय…

शाहू, फुले आंबेडकरांना मानणारी आमची पार्टी आहे….पण आमचं पॉलिटीक्स कुणाबरोबर आहे…? हिंदुत्त्ववाल्यांबरोबर…

का, तर शाहू, फुले म्हणणारी आम्हाला येऊच देत नव्हती…आता आम्ही एक स्टेपतर पुढं चाललोय…

प्रत्येक पक्ष त्या त्या जातीतला माणूस तयार करतो…पण, त्याचा रिमोर्ट कंट्रोल दुसरा असतो…

ओबीसीनी कुणाच्या रिमोर्ट कंट्रोलखाली काम करायचं ते ओबीसीनी ठरवायचं… म्हणून ओबीसी नेत्यांचे हाल झाले आहेत…हे बीजेपीच नाही, काँग्रेसमध्ये बी आहेतच…का तर तुम्ही दुसरीकडे जाताय…साहेब मला तिकीट द्या की…मला आमदारकी द्या की, मला खासदारकी द्या की….

50 आमदार आमचे निवडून येऊद्या, मराठवाड्याचा आम्ही कॅलिफोर्निया करुन टाकू, असं महादेव जानकर म्हणाले.

संबंधित बातम्या 

‘पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मग बघून घेतो’, महादेव जानकरांचा इशारा  

महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा

Published On - 12:18 pm, Tue, 10 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI