महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा

कोकणातील शेतकऱ्यांसाठी रासपने ब्लू प्रिंट बनवली आहे. कोकणातील पाणी पाईपलाईनद्वारे मराठवाड्याला आणलं पाहिजे. गायीच्या दुधाला 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळाला पाहिजे. (mahadev jankar)

महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा
Mahadev Jankar
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 3:37 PM

औरंगाबाद: राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. (mahadev jankar addresses media at aurangabad)

महादेव जानकर यानी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी आम्ही पक्ष संघटना वाढवण्यावर भर देणार आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व प्रभागात रासपचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, असं जानकर म्हणाले. रासप पक्ष वाढत आहे. रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

200 विधानसभेत रॅली काढणार

कोकणातील शेतकऱ्यांसाठी रासपने ब्लू प्रिंट बनवली आहे. कोकणातील पाणी पाईपलाईनद्वारे मराठवाड्याला आणलं पाहिजे. गायीच्या दुधाला 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळाला पाहिजे. पण काही झारीतले शुक्राचार्य हे होऊ देत नाही, असं त्यांनी सांगितलं. 100 गाड्या घेऊन रासप राज्यातील 200 विधानसभांमध्ये रॅली काढणार आहे. या देशात जनावरांची जनगणना होते, पण माणासांची होत नाही. काँग्रेसची सत्ता असताना मंडल आयोग लागू का झाला नाही? असा सवाल करतानाच ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना न्याय द्यावा

एमपीएससीच्या बोर्डात ओबीसीचा एकही संचालक नाही. त्यामुळे ओबीसींनी जागं झालं पाहिजे. कुठपर्यंत भीग मागणार आहात? जो बंगला माझा नाही तिथे काय राहायचं हे ओबीसींनीच ठरवलं पाहिजे. ओबीसींसाठी हक्काची झोपडी बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष देऊन ओबीसींना न्याय दिला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. (mahadev jankar addresses media at aurangabad)

संबंधित बातम्या:

आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, त्यामुळेच वेळकाढूपणा सुरू आहे; फडणवीसांचा दिल्लीतून हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

2014 पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात; नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

(mahadev jankar addresses media at aurangabad)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.