AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मग बघून घेतो’, महादेव जानकरांचा इशारा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं राजीनामासत्रही सुरु झालं होतं. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्याना राजीनामे परत घेण्याचं आवाहन केल्यानंतर हे राजीनामा सत्र थांबलं. मात्र, त्यावेळी महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना इशारा दिला आहे. जानकर आज औरंगाबादेत बोलत होते.

'पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मग बघून घेतो', महादेव जानकरांचा इशारा
पंकजा मुंडे, महादेव जानकर फाईल फोटो
| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 09, 2021 | 4:38 PM
Share

औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी समोर आली होती. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं राजीनामासत्रही सुरु झालं होतं. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्याना राजीनामे परत घेण्याचं आवाहन केल्यानंतर हे राजीनामा सत्र थांबलं. मात्र, त्यावेळी महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधकांना इशारा दिला आहे. जानकर आज औरंगाबादेत बोलत होते. (Mahadev Jankar’s warning to Pankaja Munde’s opponents)

पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. तिच्यावर काही अन्याय झाला असेल तर माझ्या बहिणीनं मला सांगावं मग बघू, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्याचं वॉटर ग्रीड भगवानगडावर व्हावं. असं झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असं मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे. एमपीएससी बिंदू नामावलीच्या नावाखाली धनगर, वंजारी यांना नेहमीच डावल्याचा प्रयत्न केला जातो. या विषयी एमपीएससीनं लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही महादेव जानकर यांनी केली आहे.

ओबीसी समाजासाठी 29 ऑगस्टनंतर जनजागृती अभियान

ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वत: या कमिटीचं प्रमुख व्हावं आणि ओबीसींची डेटा तयार करावा, अशी मागणीही महादेव जानकर यांनी केलीय. ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय समाज पक्ष 29 ऑगस्टनंतर मुंबईतून जनजागृती अभियान सुरु करणार असल्याचंही जानकर म्हणाले. ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही जानकर यांनी मांडली आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारनं इम्पिरिकल डेटा तयार करावा, असंही जानकर यांनी म्हटलंय.

मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?

राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. जानकर यानी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी आम्ही पक्ष संघटना वाढवण्यावर भर देणार आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व प्रभागात रासपचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, असं जानकर म्हणाले. रासप पक्ष वाढत आहे. रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

ओबीसींच्या आरक्षणासाठी आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम

महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा

Mahadev Jankar’s warning to Pankaja Munde’s opponents

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी