ओबीसींच्या आरक्षणासाठी आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम

ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरणार आहे. (mahadev jankar)

ओबीसींच्या आरक्षणासाठी आता महादेव जानकर मैदानात; रविवारी राज्यभरात चक्काजाम
Mahadev Jankar

बीड: ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरणार आहे. रासप नेते महादेव जानकर यांनी उद्या रविवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जानकर यांच्या उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (mahadev jankar call chakka jam andolan in maharashtra)

महादेव जानकर यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्या रविवारी होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करतील. ओबीसींना लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनाद्वारे या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं जानकर यांनी सांगितलं.

जानकरांचा मानखुर्दमध्ये चक्काजाम

उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात स्वत: जानकरही सहभागी होणार आहेत. ते मुंबईतील मानखुर्द येथे शेकडो कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन करणार आहेत.

भाजपचा राज्यभर चक्काजाम

दरम्यान, 26 जून रोजी भाजपने ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं होतं. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर, भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ओबीसी आरक्षण हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रद्द झालेलं आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी शेलार आणि महाजन यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. सरकार ओबीसी आरक्षणविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाणे येथे चक्काजाम आंदोलन केलं होतं. (mahadev jankar call chakka jam andolan in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

पाच वर्षात काय दिवे लावलेत ते चंद्रकांतदादांनी सांगावं; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ, पंकजा मुंडे, पटोले, संजय राठोड एकाच मंचावर येणार?; वडेट्टीवारांनी बोलावली ‘चिंतन’ बैठक!

Video : ‘अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, बीडमधील लाठीमाराच्या प्रकारानंतर पंकजा मुंडेंची टीका

(mahadev jankar call chakka jam andolan in maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI