AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निवडणूक आयोगसुद्धा कुठे ना कुठे दबलेला”; काँग्रेस नेत्याने भाजपवर गंभीर आरोप केले…

काँग्रेसने ओबीसी संदर्भातला प्रस्ताव पारित केला आहे अजूनही वेळ गेलेली नाही भाजपने आता हे जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

निवडणूक आयोगसुद्धा कुठे ना कुठे दबलेला; काँग्रेस नेत्याने भाजपवर गंभीर आरोप केले...
| Edited By: | Updated on: Mar 06, 2023 | 12:17 AM
Share

नागपूर : ज्या दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यापासून काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच नुकताच पुण्यातील कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला, त्यामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसकडून आता बदलाचे वारे राज्यात वाहू लागले आहेत असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याबद्दल आज नाना पटोले यांनी बोलताना सांगितले की, या निवडणुका झाल्याबद्दल त्या निवडणुकांचा अहवाल हाय कमांडला देण्यासाठी मी दिल्ली गेलो होता. त्यानंतर आज मी दिवसभर मुंबईत बैठका चर्चा करून आता नागपूरला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षासोबत जनता आहे हे भाजप स्वतः सांगत असेल तर या वाक्याचा आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर बीजेपी हा मूठभर उद्योगपत्यांचा पक्ष असल्याची टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केली.

भाजपवर टीका करताना त्यांनी एक लाख कोटी रुपयांचा कोळसा अदानीला फुकट देण्याचा काम पंतप्रधान करत असतील आणि दुसरीकडे महागाई, बेरोजगारी वाढवत असतील तर शेतकऱ्यांच्या समस्या या वाढणाऱ्याच आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे कांदा घेतला जात नाही धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे असल्याची टाकीही त्यांनी यावेळी केली आहे

बीजेपी या लोकशाही पद्धतीने काँग्रेसचा उमेदवार निवडून आला त्याची तुलना करत असेल तर त्याचं स्वागत आम्ही करतो असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे.

यावेळी त्यांनी पोटनिवडणुकीबरोबरच नागपूर शिक्षक मतदार संघ असो किंवा अमरावतीचा पदवीधर मतदार संघ असो आज काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे.

सुशिक्षित लोकं आता काँग्रेसच्या बाजूने उभा आहेत. आणि जनतेचे मत काँग्रेसच्या बाजूने आहे हे कसब्याच्या निवडणुकीत सिद्ध झाला आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महापुरुषांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या अनेक मंत्र्यांनी या विचाराला अपमानित करण्याचाही प्रयत्न केला आहे.

बीजेपीने सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बदल आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. या स्थानिक पातळीवरच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन त्या पद्धतीने निर्णय घेतल्या जातो मात्र ज्या पक्षाला जास्त बहुमत असेल त्या पक्षाला झुकतं माप त्या ठिकाणी दिलं जातं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मात्र या निवडणुका होतील की नाही होतील याची चिंता आमच्या मनात असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षात असताना ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात भीम गर्जना केली जात होती मात्र आज आपण पाहतोय की जनगणना सुरू झाली मात्र जातीनिहाय जनगणना होत नसल्याची गंभीर टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

मात्र काँग्रेसने ओबीसी संदर्भातला प्रस्ताव पारित केला आहे अजूनही वेळ गेलेली नाही भाजपने आता हे जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या जात नाही हा प्रश्न आहे. तरीही निवडणूक आयोग का शांत बसले आहे.

अधिसूचना का काढत नाही, कोर्टाने सुद्धा सूचना केल्या आहे पण निवडणूक आयोगसुद्धा कुठे ना कुठे दबलेला आहे आणि भाजपला हरण्याची भीती आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.