AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Murder | वेडसर व्यक्तीने मागितली सिगारेट, पिणाऱ्यांची बेदम मारहाण, नाहक जीवाला मुकला

वेडसर व्यक्तीने सिगारेट मागितली आणि त्यातून झालेल्या वादातून दोन आरोपीने वेडसर असलेल्या व्यक्तीची हत्या केली. हत्येची घटना अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील अंबा शिवशक्तीनगर परिसरात घडली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Nagpur Murder | वेडसर व्यक्तीने मागितली सिगारेट, पिणाऱ्यांची बेदम मारहाण, नाहक जीवाला मुकला
वेडसर असलेल्या व्यक्तीची हत्याImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 3:36 PM
Share

नागपूर : नागपुरात हत्या होण्यासाठी मोठ्या कारणांची गरज नाही की काय अस वाटायला लागलं. शुल्लक कारण सुद्धा हत्येसाठी पुरे आहे. अजनी पोलीस (Ajni Police) स्टेशन हद्दीत संदीप दुपारे (Sandeep Dupare) नावाचा वेडसर इसम फिरत होता. त्याच ठिकाणी दोन जण सिगारेट पीत होते. संदीपने त्यांना सिगारेट मागितली आणि त्यांना शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्या इसमाचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटना स्थळ गाठत चौकशी केली. पोलिसांनी तपास करत दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती अजनीचे पीआय सारीन दुर्गे (Ajni PI Sarin Durga) यांनी दिली. हा वेडसर असलेला इसम त्याच भागातील आहे. तो त्याच परिसरात फिरायचा, असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. मात्र शुल्लक कारणावरून झालेली चिंतेचा विषय बनला आहे.

दोन आरोपींना अटक

अजनी हद्दीतील अंबा शिवशक्तीनगर येथे संदीप दुपारे नावाचा वेडसर व्यक्त राहतो. संदीपची रात्री हत्या झाली. दोन आरोपींना अटक करण्यात आली. सिगारेट मागण्यावरून वाद झाला होता. शिवीगाळ केल्यानं दगडाने डोक्यावर वार करण्यात आला. राकेश बाहेश्वर आणि उज्वल भिसीकर हे दोन आरोपी सापडलेत. राकेशवर यापूर्वीचा गुन्हा दाखल आहे. उज्ज्वलविरोधातही 2016 व 2020 मध्ये दोन घटनांत गुन्हे दाखल आहेत.

मृतक वेडसर असल्याची माहिती

मृतकाच्या घरच्यांना विचारणा करण्यात आली. तो वेडसर असल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. तो घरी राहत नव्हता. घराबाहेर राहून फिरत असे. घटनेच्या वेळी तो अंबा शिवशक्तीनगर परिसरातच फिरत होता. आजूबाजूच्या लोकांना विचारणा केली. तेव्हा गेल्या सात-आठ दिवसांपासून तो याच परिसरात फिरत असल्याचं लोकांनी सांगितलं. तो रिकाम्या बॉटल्स जमा करत असल्याचं आजूबाजूच्यांनी सांगितलं.

Video Amravati Hanuman Chalisa | अमरावतीत भोंगे, हनुमान चालीसावरून कार्यकर्ते नाराज; युवा स्वाभिमानच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र

Amravati | पिसाळलेला कुत्रा शोधा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा; अमरावतीत बळवंत वानखडेंनी कुणावर केली बोचरी टीका?

Devendra Fadnavis: वसुली रॅकेटमुळे पोलिसांच्या बदल्या केल्या का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.