AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मुख्यमंत्री असताना आणि नंतर गोव्याचे प्रभारी असताना फोन टॅपिंगचा आरोप, आता फडणवीसांचं थेट उत्तर

शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) पुन्हा आरोपांचा नवा बॉम्ब टाकला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना आधी राज्यात फोन टॅपिंग झालं. राज्यात विरोधी पक्षातील नेत्यंचे फोन टॅप केले गेले. आणि आता फडणवीस गोव्याचे प्रभारी असताना गोव्यातल्या काही नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप केलाय.

आधी मुख्यमंत्री असताना आणि नंतर गोव्याचे प्रभारी असताना फोन टॅपिंगचा आरोप, आता फडणवीसांचं थेट उत्तर
राऊतांच्या आरोपांना फडणवीसांचे प्रत्युत्तरImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 3:56 PM
Share

नागपूर : राज्यात पुन्हा फोन टॅपिंगचे (Phone Tapping) प्रकरण पुन्हा बाळसं धरू लागलंय. कारण शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) पुन्हा आरोपांचा नवा बॉम्ब टाकला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना आधी राज्यात फोन टॅपिंग झालं. राज्यात विरोधी पक्षातील नेत्यंचे फोन टॅप केले गेले. आणि आता फडणवीस गोव्याचे प्रभारी असताना गोव्यातल्या काही नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर गोव्यासह देशभर खळबळ माजली आहे. राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय. फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हावी अशी मागणी सतत काँग्रेसकडून करण्यात येत आहे. अशातच राऊतांच्या नव्या या आरोपांनी पुन्हा खळबळ माजली आहे. तर राऊतांच्या या आरोपांना फडणवीसांनीही खोचक उत्तर दिलंय.

फडणवीसांचे राऊतांना खोचक प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणात या सगळ्याने माझं मनोरंजन होतंय. या आरोपात काही तथ्य नाही. राऊतांचे आरोप बिनबुडाच्या असल्याचे भाजप नेते सांगता आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. नुकताच त्यांच्या चौकशीचा अहवाल आला असून या प्रकरणी त्या दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या सत्तेसाठीच्या स्पर्धेची किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा शरद पवार यांनी दिला. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा ट्विस्ट येताना दिसंय.

राऊतांचे आरोप काय?

ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (digambar kamat) भेटले होते. त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती. काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे, अशी टीका करतानाच महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत

कुणाचे फोन टॅप?

फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयानं त्यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, असा सूचना दिल्या आहेत. त्या काळात काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीका

नांदेडमध्ये नागरिकांचा रास्ता रोको, हिमायतनगर ते किनवट महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.