अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडे’एमडी ड्रग्ज’; उपराजधानीत खळबळ

नागपूर शहरातील ही काही पहिलीच कारवाई नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयीन युवकांकडे ड्रग्ज सापडत असल्याने आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडे'एमडी ड्रग्ज'; उपराजधानीत खळबळ
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:56 PM

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातय काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणी काही युवकांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. आजही ड्रग्जप्रकरणी नागपूरमधील जरीपटका पोलिसांनी एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अटक केल्याने खळबळ माजली आहे. नागपूर पोलिसांकडून काही दिवसापूर्वीच ड्रग्ज प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यावेळेपासून नागपूर शहरात ड्रग्ज येते कुठून असा सवाल जनसामान्यांमधून केला जात आहे. आता पुन्हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने नागपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे.

उपराजधानी नागपुरात जरीपटका पोलिसांनी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांला एमडी(ड्रग्ज) सोबत अटक केल्याची धक्कादायक बाब समोर आली असल्याने अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेला तरुण हा 20 वर्षीय असून त्याच्याकडे आता कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जरीपटका पोलीस गस्तीवर असताना पोलिसांना बघून दुचाकीने जाणारा तरुण पळत जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एमडी पावडर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

कॉलेज तरुणांच्या हातात ड्रग्ज सापडल्याने आता त्याचा शोध घेणं सुरु करण्यात आले आहे. शहरात एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना उपराजधानीतील युवक ड्रग्जच्या आहारी जात असल्याच धक्कादायक चित्र समोर आल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागपूर शहरातील ही काही पहिलीच कारवाई नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयीन युवकांकडे ड्रग्ज सापडत असल्याने आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.