“उद्धव ठाकरे यांचे वाईट दिवस सुरु”; भाजपने ठाकरे गटाच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केला…

पोस्टरवर राहुल गांधी असो, किंवा सोनिया गांधी असो आता उद्धव ठाकरे यांचे संधीसाधू राजकारण लोकांच्या लक्षात आल्यामुळे लोकं त्यांच्यासोबत जातील याची शक्यता नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांचे वाईट दिवस सुरु; भाजपने ठाकरे गटाच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केला...
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:58 PM

जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी तीन वर्षापूर्वी सोनिया गांधी यांच्यासोबत शपथ घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या नेतृत्वाविषयी माझ्या मनात शंका निर्माण झाली होती असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला होता, त्याचवेळी त्यांनी हिंदुत्व सोडले असल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर केली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये फरक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कणखर नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

सत्ता स्थापन करताना उद्धव ठाकरे हे कायमच संधीसाधू राजकारण करत आले आहेत. ते संधीसाधू असल्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीबरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे त्यांना जर आता आपल्यासोबत कोण येणार असं वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी संधीसाधू राजकारण केले आहे. त्यांच्या या राजकारणामुळेच त्यांना आता लोकं कोण स्वीकारणार नाहीत असा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीच्या फोटोवरून गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोस्टरवर राहुल गांधी असो, किंवा सोनिया गांधी असो आता उद्धव ठाकरे यांचे संधीसाधू राजकारण लोकांच्या लक्षात आल्यामुळे लोकं त्यांच्यासोबत जातील याची शक्यता नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

गिरीश महाजन यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या राजकारण आता लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांच्यासोबत कोण जाईल की नाही याबाबतही शंका आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.