Elephant News : एअर इंडिया, पोलीस अकादमीनंतर महाराष्ट्रातील हे वैभवही गुजरातला हलवणार, केंद्र सरकारचा निर्णय

Elephant News : एअर इंडिया, पोलीस अकादमीनंतर महाराष्ट्रातील हे वैभवही गुजरातला हलवणार, केंद्र सरकारचा निर्णय
महाराष्ट्रातील १३ हत्ती जामनगर येथे पाठविण्याचा केंद्र शासनाचा निर्णय
Image Credit source: twitter

ट्रस्टने कमलापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचे व्यवस्थापन करण्याचे मान्य केले आहे. तसेच या सुविधांच्या निर्मितीसाठी लागणारा सर्व खर्च ट्रस्टकडून करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी लागणारा खर्चही करण्याचे मान्य केले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 12, 2022 | 11:31 AM

हिरा ढाकणे, नागपूर : ताडोबासह (Tadoba) गडचिरोली (Gadchiroli) येथील कमलापूर व पातानील येथील एकूण 13 हत्ती (Elephant) गुजरातमधील जामनगर येथे पाठविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याची माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) युवराज एस. यांनी दिली आहे. राज्यातील बंदिस्त हत्तींच्या उत्तम स्वास्थ्यासाठी व व्यवस्थापनासाठी वन विभाग कटिबध्द आहे. याकरीता विविध तज्ज्ञ व या क्षेत्रातील मान्यताप्राप्त अशासकीय संस्थांचा सहयोग घेण्यात येत आहे. कमलापूर येथील आठ हत्तींपैकी चार सुदृढ हत्तींसाठी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळासाठी नवीन सोयी सुविधा राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट यांच्याकडून निर्माण करण्यात येणार आहेत.

स्थानिक गावकऱ्यांना मिळणार रोजगाराच्या संधी

या ट्रस्टने कमलापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचे व्यवस्थापन करण्याचे मान्य केले आहे. तसेच या सुविधांच्या निर्मितीसाठी लागणारा सर्व खर्च ट्रस्टकडून करण्याची तयारी दर्शविली असून, त्यासाठी लागणारा खर्चही करण्याचे मान्य केले आहे. यामुळे स्थानिक गावकऱ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर करण्यात येणार नाही

कमलापूर येथील चार सुदृढ हत्तींशिवाय कमलापूर, पातानील व ताडोबा येथील वयोवृध्द, अप्रशिक्षित व लहान पिल्ले अशा एकूण तेरा हत्तींच्या पुढील जीवनकाळातील योग्य स्वास्थ व उच्च दर्जाच्या वैद्यकीय देखरेखीसाठी, प्रशिक्षित व अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उपचाराची सोय व उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी, राहण्यासाठी प्रशस्त व भरपूर जागा असलेल्या जामनगर स्थित राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे पाठविण्यात येणार आहे. त्यांना यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर करण्यात येणार नाही. तसेच प्राणिसंग्रहालयाप्रमाणे कोठेही प्रदर्शितही करण्यात येणार नाही. वन विभागाने हे हत्ती राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट, जामनगर येथे पाठविण्यासाठी केंद्र शासनाकडून नियमानुसार ना-हरकत पत्र प्राप्त केले आहे. सर्व हत्तींची आजन्म काळजी ट्रस्टकडून घेण्यात येणार असल्याचे वनसंरक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक युवराज एस. यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें