“बदमाशी कोणाकडून शिकायची?;” नाना पटोले यांचा हल्लाबोल

हे सरकार जास्त दिवस राहणे म्हणजे घटनेचा खून होईल. नऊ महिन्यांपासून न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यास एवढा उशीर होणं हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे.

बदमाशी कोणाकडून शिकायची?; नाना पटोले यांचा हल्लाबोल
नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 5:03 PM

नागपूर : सर्वोच्च न्यायालयात शिंदे-ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावरून सुनावणी सुरू आहे. वाद-प्रतिवाद दोन्ही गटांकडून केले जात आहेत. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सर्वोच्च म्हणाले, घटनेचा परिशिष्ट 10 एकदम स्पष्ट आहे. या सुनावणीवरून हे लक्षात येते की बदमाशी शिकायची असेल, तर या खोके वाल्यांकडून शिकली पाहिजे. या प्रकरणी दोन आमदारांनी ईमेलद्वारे अविश्वासाची नोटीस दिली होती. मात्र नियमाप्रमाणे याची एक वेगळी प्रक्रिया आहे. घटनापीठ पाच न्यायाधीशांचे असो किंवा सात न्यायाधीशाचे. मात्र निर्णय लवकर झाला पाहिजे. कारण मुळातच हे सरकार घटनाबाह्य आहे. त्यामुळे जास्त दिवस हे सरकार सत्तेत राहिल्यास अनेक निर्णय चुकीचे होतील, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

हे लोकशाहीसाठी दुर्दैवी

नाना पटोले म्हणाले, हे सरकार जास्त दिवस राहणे म्हणजे घटनेचा खून होईल. नऊ महिन्यांपासून न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यास एवढा उशीर होणं हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. परिशिष्ट दहाप्रमाणे लवकर निर्णय व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे.

काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाही. कालच्या बैठकीत सर्व नेते उपस्थित होते. सर्वांनी आपापली भूमिका मांडली. पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले आहे.

काँग्रेसच्या बैठकीत काय झालं

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोकून द्यावं आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असा निर्णय कालच्या बैठकीत झाला असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं. या पोटनिवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीचे बाजूनेच लागतील असा आमचा विश्वास असल्याचं ते म्हणाले.

अर्धा डझन मंत्री का?

कसबापेठ आमचाच मतदार संघ आहे, असं भाजपचे लोक छाती ठोकून सांगतात. मात्र तरी अर्धा डझन मंत्री तिथे का बसून आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून मलिदा खाण्याचा भाजपचा धोरण आहे का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. कितीही काही केलं तरी कसबा आणि चिंचवड जागा भाजप जिंकू शकत नाही, असंही ते म्हणाले.

विखे पाटील सत्तेचे लालची

विखे पाटील फक्त सत्तेसाठीच लालची आहेत का? उद्या काँग्रेसची सत्ता आली तर विखे पुन्हा काँग्रेसमध्ये येतील का. त्यांच्या वाक्यातून तसाच अर्थ लावता येतो, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

ओबीसींचा प्रश्न प्रलंबित

देवेंद्र फडणवीस यांनी काय पुढे आणावं किंवा काय नाही आणावं, हा त्यांचा प्रश्न आहे. साडेतीन वर्षांपूर्वी पहाटेच्या सरकारची घटना झाली होती. केंद्राची सत्ता आणि पैशाचा वापर करून महाराष्ट्रात त्यांनी सत्ता तर आणली. मात्र सत्ता आणल्यानंतर ओबीसींचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आहेत, याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.