नागपूर विद्यापीठाच्या धावपटूंसाठी खुशखबर; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ट्रॅकची सुविधा लवकरच! कधीपर्यंत सेवेत?

नागपूर विद्यापीठाच्या धावपटूंसाठी खुशखबर; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ट्रॅकची सुविधा लवकरच! कधीपर्यंत सेवेत?
नागपूर विद्यापीठाच्या ट्रॅकचे छायाचित्र (टाईम्स ऑफ इंडिया)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या धावपटूंसाठी खुशखबर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ट्रॅकची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. हे कधीपर्यंत सेवेत येईल, याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 22, 2022 | 5:17 AM

नागपूर : विद्यापीठं म्हटलं की, विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास कसा करता येईल, याकडे लक्ष दिलं जातं. केवळ अभ्यास म्हणजे विकास नव्हे. म्हणून खेळाच्या दृष्टिकोनातून शारीरिक शिक्षण विभागाला लक्ष द्यावं लागते. पारंपरिक खेळांव्यतिरिक्त मैदानावर सिंथेटिक ट्रॅक (Synthetic Track) हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, यासाठी शारीरिक शिक्षण विभाग (Department of Physical Education) प्रयत्नरत होतं. बऱ्याच प्रतीक्षेनंतर विद्यापीठाने यासाठी मंजुरी दिली. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते ट्रॅकचे भूमिपूजन झाले. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. आता हे ट्रॅक लवकरच सेवेत येणार आहे. विद्यापीठातील खेळाडूंची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये ते कसे सेवेत आणता येईल, यासाठी सारी धडपड सुरू आहे.

कसा असेल सिंथेटिक ट्रॅक

नागपूर विद्यापीठाच्या मैदानावरील सिंथेटिक ट्रॅकसाठी जवळपास साडेदहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे सिंथेटिक ट्रॅक विद्यापीठाच्या स्वतःच्या पैशातून बांधण्यात येत आहे. या ट्रॅकच्या बांधकामाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईच्या स्पोर्ट्स फॅसिलिटीजकडे दिले आहे. या सिंथेटिक ट्रॅकला एकूण आठ लेन असतील. या ट्रॅकच्या बाजूला लांब उडी व तिहेरी उडीसाठी दोन जम्पिंग पीट राहणार आहेत. तसेच मैदानाच्या चारही बाजूंनी फ्लडलाईट्‌सची व्यवस्था राहील. हातोडा व गोळाफेकीसाठी विशेष प्रकारचा पिंजरा राहील.

जुलैपूर्वीपर्यंत काम करण्याचे आव्हान

विद्यापीठाचा स्वतःचा सिंथेटिक ट्रॅक असावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. विद्यापीठाचे स्वतः पैसे खर्च करायचे ठरविले. ट्रॅकचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हे काम वेळेवर कसे पूर्ण होईल, यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू स्वतः लक्ष घालत आहेत. पावसाळ्यापूर्वी ट्रॅक पूर्ण कसा करता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. सूर्यवंशी म्हणाले, सिंथेटिक ट्रॅकच्या ड्रेनेजचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामही जोमाने सुरू आहेत. त्यामुळे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जुन्या शिंडर ट्रॅकमध्ये असलेले दोषही दूर करण्यात येणार आहेत.

असेही पशुप्रेम! कुत्रीसह दोन पिल्ले मध्यरात्री पडली विहिरीत; मलकापुरातील पशुप्रेमींनी रातोरात कसे काढले बाहेर?

Ganesh Tekdi temple | नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात मुलं, ज्येष्ठांना प्रवेश बंद, कारण काय?

Video | नागपुरात चट मंगनी, पट ब्याह! दहा मिनिटांत नोंदणी; अर्ध्या तासात लग्न, कसे ते वाचा

 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें