AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hadpakya Ganpati : विदर्भातील अनोखी प्रथा, पितृपक्षात केली जाते मसकऱ्या गणपतीची स्थापना

पितृपक्ष संपेपर्यंत चालणारा हा गणपतीचा उत्सव असतो आणि यामध्ये अनेक सांस्कृतिक कला सादर केल्या जातात. नागपूरची ही अबाधित  अशी परंपरा आजही तत्कालीन राजांचे वंशज मुधोजी राजे भोसले चालवत आहे. 

Hadpakya Ganpati : विदर्भातील अनोखी प्रथा, पितृपक्षात केली जाते मसकऱ्या गणपतीची स्थापना
हडपक्या गणपतीImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2023 | 10:44 AM
Share

सुनील ढगे

नागपूर : अनंत चतुर्दशीला ठिकठीकाणच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. दहा दिवसांच्या या गणेशोत्सवात गणेश भक्तांनी देवाची खुप सेवा केली. त्यानंतर लाडक्या बाप्पाला अत्यंत भावून होऊन निरोप दिला. गणेशोत्सव जरी संपला असला तरी नागपूरात मात्र एक आगळी वेगळी परंपरा जोपासली जाते. नागपुरात गणेश विसर्जनाच्या नंतर पितृपक्षामध्ये हडपक्या (Hadpakya Ganpati 2023) किंवा मस्कऱ्या गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. नागपूरचे राजे असलेल्या भोसलेंच्या वाड्यामध्ये या गणपती बाप्पाची स्थापना होत असते.

कशी सुरू झाली ही परंपरा?

1887  साली या गणपती बाप्पाची पहिल्यांदा स्थापना झाली आणि ही परंपरा गेल्या 237 वर्षापासून अबाधित सुरू आहे. 1887 मध्ये पश्चिम बंगालवर मोठ संकट आलं होतं.  त्या काळात नागपूरचे राजे चिमाजी भोसले हे बंगालवर स्वारी करायला गेले. त्या ठिकाणावरून ते विजय प्राप्त करून आल्यानंतर गणपती उत्सव संपलेला होता. मात्र राजांनी गणपती बाप्पाला विजयाचा नवस बोलला होता आणि तो विजयाचा नवस फेडण्यासाठी पितृपक्षामध्ये या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून तर आतापर्यंत 237 वर्षाची ही अबाधित परंपरा सुरू आहे. या गणपती बाप्पाला नवसाला पावणारा गणपती असं सुद्धा म्हटल्या जातं.

पितृपक्ष संपेपर्यंत चालणारा हा गणपतीचा उत्सव असतो आणि यामध्ये अनेक सांस्कृतिक कला सादर केल्या जातात. नागपूरची ही अबाधित  अशी परंपरा आजही तत्कालीन राजांचे वंशज मुधोजी राजे भोसले चालवत आहे.

सुरवातीला चिमणाजी भोसले यांनी  बारा हात असलेली 21 फुट उंचीची गणपतीची मुर्ती स्थापण केली होती. अनेक वर्ष ही परंपरा तशीच पाळण्यात आली. त्यानंतर 2005 पासून या मुर्तीची उंची कमी करण्यात आली. दरवर्षी अनंत चतुर्दशीला या गणपतीची स्थापना केली जाते. हा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्यामागे लोककलांना प्राधान देने हा देखील एक उद्देश होता. हडपक्या गणेशोत्सवाच्या काळात खडीगंमत, लावण्या, पोवाडे, भजन यासारखे कार्यक्रम आयोजीत केले जात असे. आता त्याची जागा सुगम संगीत, हास्यकल्लोळ, जागरण, आनंद मेळावा व अशा कार्यक्रमांनी घेतली आहे.

फक्त भोसले वाड्यातच नाही तर विदर्भात अनेक ठिकाणी या हडपक्या गणपतीची स्थापना केली जाते. हा आगळावेगळा गणेशोत्सव विदर्भाचे वैशिष्ट्य आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.