AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात ईडीच्या कारवाईनंतर सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले, सडलेल्या सुपारीचा गोरखधंदा उघड

सडलेल्या सुपारीवर प्रक्रिया करून कोट्यवधी रुपयांचा गोरोख धंदा उपराजधानी नागपुरात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नागपुरात ईडीच्या कारवाईनंतर सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले, सडलेल्या सुपारीचा गोरखधंदा उघड
सुपारी तस्करी Image Credit source: Social Media
| Edited By: Nitish Gadge | Updated on: Dec 04, 2022 | 8:19 PM
Share

नागपूर,  उपराजधानीत सुपारीचा मोठा गोरोखधंदा (Illegal betel nut business)  उघड झाला आहे. सडलेल्या सुपरवर प्रक्रिया करून तिला बाजारात विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईडीने नुकतीच छापेमारी (ED raid) करून 11 कोटी रुपयांची सुपारी जप्त केली. या कारवाईनंतर नागपुरातल्या (Nagpur) 100 पेक्षा जास्त सुपारी गोदामांना तीन दिवसांपासून टाळे लागले आहे. नागपुर आणि परिसरात  खर्ऱ्यासाठी सुपारीचा वापर मोठ्याप्रमाणात होतो. जास्त नफा कमविण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या सुपारीलाही मोठी मागणी असते.

सडलेल्या सुपारीतून असे कमवितात कोट्यवधी रुपये

इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, श्रीलंकेतील निकृष्ट सुपारीची नागपूरात तस्करी करण्यात येते. धक्कादायन बाब म्हणजे या देशांमध्ये घाणीत फेकलेली ही सुपारी नागपुरातील काही व्यापारी आयात करतात. ही सुपारी आसाम, चेन्नई, कोलकता येथील बंदरांवरुन भारतात येते आणि तिथून पुठे ती नागपुरात येते. या सडलेल्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती बाजारात विकल्या जाते. या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.

इडीची कारवाई

दुपारच्या गैरव्यवहारप्रकरणी नुकतीच ईडीने मोठी कारवाई केली. यामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली. ईडीच्या या कारवाईमुळे अनेक सुपारी व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे. नागपुरातील 100 पेक्षा अधिक गोदामांना गेल्या तीन दिवसांपासून टाळे लागले असल्याचे समोर आले आहे.

छुप्या मार्गाने विक्री सुरूच

डंपिंग यार्डमध्ये जाण्याच्या दर्जाची सुपारी भट्टीमध्ये टणक करण्याचा गोरोखधंदा छुप्या मार्गाने सुरु आहे. नाव बदलवून दुसऱ्या नावाने हा गोरख धंदा सुरु असल्याची माहिती सूत्रानी दिली. अद्याप या प्रकरणात कुठल्याही बड्या व्यापाऱ्याचे नाव समोर आले नसले तरी याचे तार मुंबईसह आंतरराष्ट्रीय पातळीवर जुळलेले असल्याची सूत्राची माहिती आहे. ईडीच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?