हमीभावासाठी भारतीय किसान संघ आक्रमक, देशात 515 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये करणार आंदोलन

| Updated on: Aug 19, 2021 | 10:45 PM

हमीभावाची हमी मिळायला हवी. त्यासाठी लागणारी व्यवस्था सरकारने केली पाहिजे अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. या मागणीला घेऊन भारतीय किसान संघातर्फे देशातील 515 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

हमीभावासाठी भारतीय किसान संघ आक्रमक, देशात 515 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये करणार आंदोलन
NAGPUR FARMER PRESS
Follow us on

नागपूर : हमीभावाची हमी मिळायला हवी. त्यासाठी लागणारी व्यवस्था सरकारने केली पाहिजे अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. या मागणीला घेऊन भारतीय किसान संघातर्फे देशातील 515 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये येत्या 8 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. (Indian Farmers Union demands guarantee of minimum support price will protest in 515 districts across the country)

बाजारपेठेत खुलेपणा, स्पर्धा असली पाहिजे

भारतीय किसान संघाच्या विदर्भ प्रांताची बैठक आज नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठक झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिनेश कुलकर्णी यांनी हमीभाव आणि भारतीय किसान संघाच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती दिली. भारतीय किसान संघाची भूमिका शेतकरी हिताची आहे. आमचा कृषी कायद्यांना विरोध नाही. बाजारपेठेत खुलेपणा असला पाहिजे. स्पर्धा असली पाहिजे, असं आमचं फार पूर्वीपासूनचं मत आहे. परंतु त्यात काही सुधारणा करायला पाहिजे होत्या, असं दिनेश कुलकर्णी म्हणाले.

प्रत्येक ठिकाणी हमीभावाची हमी मिळायला हवी

तसेच पुढे बोलताना या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकार जी किंमत देतं ती मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. सरकारची खरेदी असो वा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील किंवा समितीच्या बाहेरची खरेदी किंमत या सर्व ठिकाणी हमीभावाची हमी मिळाली पाहिजे. त्यासाठी कायद्यात योग्य त्या सर्व दुरुस्त्या केल्या पाहिजेत, असे भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी म्हणाले. याच मागण्यांना घेऊन किसान संघातर्फे आगामी काळात आंदोलन करण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण; रोचकरी बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, देवानंद रोचकरींवर 35 गंभीर गुन्हे नोंद

अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला

चोराची सिनेस्टाईल पळवापळवी, किराणा दुकानदाराला हजारोंचा गंडा, मग नोकराचा मोबाईल हिसकावला, नंतर रस्त्यावर दुचाक्या उडवल्या

(Indian Farmers Union demands guarantee of minimum support price will protest in 515 districts across the country)