AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परभणीच्या शेतकऱ्यांची पुण्यात धडक, पीक विमा प्रश्नी आक्रमक, 3 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी

शेतकऱ्यांनी पीक विमा प्रश्नी आंदोलन केलं आहे. सन 2020-21 खरीप हंगामातील सोयाबीनचा पीकविमा मिळावा या साठी डोंगरी विकास जनआंदोलनाच्या वतीने पुण्यातील कृषी आयुक्तालय कार्यालया समोर बेमुद्दत घंटानाद आंदोलन सुरु केले आहे.

परभणीच्या शेतकऱ्यांची पुण्यात धडक, पीक विमा प्रश्नी आक्रमक, 3 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी
परभणीतील शेतकऱ्यांचं पुण्यात आंदोलन
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 7:01 PM
Share

परभणी: परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागातील माखणी, पिंपळदरी महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा प्रश्नी आंदोलन केलं आहे. सन 2020-21 खरीप हंगामातील सोयाबीनचा पीकविमा मिळावा या साठी डोंगरी विकास जनआंदोलनाच्या वतीने पुण्यातील कृषी आयुक्तालय कार्यालया समोर बेमुद्दत घंटानाद आंदोलन सुरु केले आहे.

3 हजार शेतकऱ्यांची तक्रार

सप्टेंबर – अक्टोबर महिन्यात गंगाखेड तालुक्यातील डोंगरभागात अतिवृष्टी झाली होती. यामुळे या भागातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या भागातील शेतकऱ्यांनी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विमा भरला होता. त्यामुळे रिलायंस कंपनीने शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देणे अपेक्षित होते. मात्र, 9 महिने उलटले तरीही शेतकऱ्यांना अजूनही पीकविम्याचे पैसे मिळाले नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी वैयक्तिक तकार अर्ज दाखल केले आहेत.

परभणीतही आंदोलन

गंगाखेड तहसील कार्यालया समोर भजन आंदोलन केली तहसीलदार मार्फत कृषि सचिव यांना निवेदन दिले मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. नेहमी कृषी आयुक्तालयात चर्चा सुरू आहे अशी उत्तर दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डोंगरी विकास जनआंदोलनाच्या वतीने कृषी आयुक्तालय कार्यालया समोर बेमुद्दत घंटानाद आंदोलन सुरु केले आहे.रिलायंस कंपनीवर गुन्हा दाखल करावा,तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केलीय.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ही आंदोलन

महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवण्यास परवानगी मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यास परवानगी मागण्यात आली. मात्र, पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. महिनाभरात दुसऱ्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काही दिवसांपूर्वी पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

2020 मध्ये परतीच्या मुसळधार अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. सुमारे 4 लक्ष 32 हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टी ने नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रधानमंत्री पीक योजनेत जवळपास 17 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेत मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांचा पीकविमा भरला होता. नुकसानभरपाईपोटी फक्त 20 हजार शेतकऱ्यांनाचा पीकविमा नुकसान भरपाई मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना विमा मिळावा ,पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करावा, राष्ट्रीयकृत बँकेतील पीक कर्ज वाटप विनाविलंब करावे. आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आज आक्रमक झाली होती. बीड- परळी रस्त्यावर घाटसावळी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.

इतर बातम्या:

बीड पॅटर्नसाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना साकडं, स्वाभिमानीचं बीड पॅटर्न विरोधात बोंब मारो आंदोलन

पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवा, राज्याची केंद्राकडे मागणी, बीड पॅटर्न नेमका काय?

Parbhani Farmers protest for compensation of Crop Insurance loss of last year heavy rain fall

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.